बोहाडा उत्सवात विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी धरला ठेका, पाहा- VIDEO
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2022 16:36 IST2022-05-08T16:35:48+5:302022-05-08T16:36:27+5:30
दिंडोरी तालुक्यातील बोपेगावं येथे बोहाडा उत्सवास विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी भेट दिली व उत्सवात पांडव मुखवटा धारण करून कला सादर केली.

बोहाडा उत्सवात विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी धरला ठेका, पाहा- VIDEO
दिंडोरी (नाशिक) - गाव उत्सवांमुळे धार्मिक सामाजिक सलोखा राखण्यास मदत होत असून बोहाडा उत्सवाची परंपरा कायम राखावी, असे आवाहन विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी केले आहे.
दिंडोरी तालुक्यातील बोपेगावं येथे बोहाडा उत्सवास विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी भेट दिली व उत्सवात पांडव मुखवटा धारण करून कला सादर केली. यावेळी ग्रामस्थांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत केले. झिरवाळ यांचे बोहड्यातील सक्रिय सहभागाने गावकऱ्यांचा आनंद द्विगुणित झाला. सरपंच वसंत कावळे यांनी झिरवाळ यांचे स्वागत केले.