शहरं
Join us  
Trending Stories
1
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
2
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप
3
इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार...
4
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! आठवडाभरात सोन-चांदीत मोठी घसरण! काय आहेत आजचे दर?
5
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
6
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
7
आईचे दुसऱ्या महिलेशी समलैंगिक संबंध, प्रेमासाठी चिमुकल्याची हत्या; पतीच्या हाती लागला व्हिडिओ अन् मग...
8
कधीकाळी चालवायचे रिक्षा, आता मुलाच्या वाढदिवशी लग्झरी कार दिली भेट; VIP नंबरसाठी मोजले ३१ लाख
9
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत
10
तुमच्या कारमधील परफ्यूम दरवळतोय पण ठरतोय 'सायलेंट किलर'! श्वास आणि मायग्रेनचा गंभीर धोका
11
Nuclear warfare: भविष्य स्फोटक आहे...
12
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
13
अर्धा तास तडफडला! फी न भरल्याने प्राध्यापकाने केला अपमान, विद्यार्थ्याने कॅम्पसमध्ये स्वतःला पेटवले
14
"तुमच्यातले शारीरिक संबंध कसे आहेत?", आंतरधर्मीय लग्न करताना मराठी गायिकेला आईने विचारलेला बोल्ड प्रश्न
15
सोनं की रिअल इस्टेट? गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय ठरेल जास्त फायदेशीर? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
16
मराठी अभिनेत्रीला डेट करतोय सुनील शेट्टीचा लेक अहान; कोण आहे ती सुंदरा?
17
जेल की रिसॉर्ट? ISIS रिक्रूटर आणि सीरियल किलरकडे मोबाईल; अधिकाऱ्यांच्या मदतीने कैद्यांची मजा
18
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
19
प्रदूषणकारी रसायनांचे उत्पादन करणारा कारखाना रत्नागिरीच्या लोटे वसाहतीत
20
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक

७० दिवसांच्या मोटारसायकलवारीतून महाराष्ट्र दर्शन !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 02:04 IST

माणूस देश-विदेशात भ्रमंती करण्याचे स्वप्न बघतो, परंतु आपण ज्या राज्यात जन्मलो ते जवळून बघण्याचा विचारही कधी मनाला शिवत नाही. नेमक्या याच विचारापासून प्रेरणा घेऊन नाशिक येथील एका युवा रायडरने अवघ्या ७० दिवसात मोटारसायकलीद्वारे महाराष्ट्राच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक व धार्मिक स्थळांना भेटी देऊन ९९३० किलोमीटरचा पल्ला गाठत महाराष्ट्र राइडची स्वप्नपूर्ती केली.

ठळक मुद्दे९९३० किलोमीटरचा प्रवास : नाशिकच्या रायडरची अनोखी भ्रमंती

नाशिक : माणूस देश-विदेशात भ्रमंती करण्याचे स्वप्न बघतो, परंतु आपण ज्या राज्यात जन्मलो ते जवळून बघण्याचा विचारही कधी मनाला शिवत नाही. नेमक्या याच विचारापासून प्रेरणा घेऊन नाशिक येथील एका युवा रायडरने अवघ्या ७० दिवसात मोटारसायकलीद्वारे महाराष्ट्राच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक व धार्मिक स्थळांना भेटी देऊन ९९३० किलोमीटरचा पल्ला गाठत महाराष्ट्र राइडची स्वप्नपूर्ती केली.बालपणापासून भ्रमंतीची गोडी असणाऱ्या नाशिक येथील कमलेश बाफना या युवकाने दि. २६ जानेवारी २०२१ रोजी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आडगाव येथून दुचाकीने महाराष्ट्र भ्रमण यात्रेला आरंभ केला. सप्तशृंगी मातेचे दर्शन घेऊन यात्रेला सुरुवात करीत सर्वप्रथम नंदुरबार जिल्ह्यातील विविध स्थळांना भेट दिली, त्यानंतर धुळे, जळगाव, बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, वाशीम, हिंगोली, परभणी, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, सातारा, बीड़, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, पुणे, ठाणे, मुंबई, पालघर असा महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांचा प्रवास करीत दि. ५ एप्रिल रोजी नाशिक येथील अशोकस्तंभाजवळ या यात्रेची सांगता केली.या यात्रेदरम्यान त्यांनी महाराष्ट्रातील गड किल्ल्यांचा गौरवशाली इतिहास जवळून जाणून घेतला. शंभराहून अधिक प्राचीन व ऐतिहासिक मंदिरे तसेच काही दुर्मिळ आणि अपरिचित असलेल्या १५० ते २०० पर्यटन स्थळांना भेटी दिल्या. यापूर्वी कमलेश यांनी २०१७ साली देशातील स्वर्णिम चतुर्भुज महामार्गाने ६८०० किलोमीटरचा प्रवास १३ दिवसात पूर्ण केला असून याचवर्षी जम्मू आणि काश्मीर येथील चेनानी नाशरी या आशियातील सर्वात लांब टनेलमध्ये सर्वप्रथम मोटारसायकल चालविण्याचा मानही त्यांनी मिळविला आहे. या ७० दिवसांत ९९३० किलोमीटरचा प्रवास करीत ३६ जिल्ह्यातील धार्मिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक स्थळांना भेट देण्याचा तसेच मोटारसायकलीने सर्वाधिक अंतराचा पल्ला गाठणारे ते पहिले मानकरी ठरले आहेत. या यात्रेदरम्यान बारा तासात प्रतिदिन सरासरी १५० किलोमीटरचा प्रवास केला.

टॅग्स :NashikनाशिकSocialसामाजिक