महाराष्ट्र चेंबरतर्फे आदर्श रिक्षाचालकांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 00:34 IST2018-09-22T00:34:00+5:302018-09-22T00:34:34+5:30
सुरक्षितपणे वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांचा महाराष्टÑ चेंबर आॅफ कॉमर्स, इंडस्ट्री अॅण्ड अॅग्रीकल्चर आणि सारथी श्री फाउंडेशन यांच्या सहकार्याने जागतिक चालक दिनानिमित्त गौरव करण्यात आला.

महाराष्ट्र चेंबरतर्फे आदर्श रिक्षाचालकांचा सन्मान
नाशिक : सुरक्षितपणे वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांचा महाराष्टÑ चेंबर आॅफ कॉमर्स, इंडस्ट्री अॅण्ड अॅग्रीकल्चर आणि सारथी श्री फाउंडेशन यांच्या सहकार्याने जागतिक चालक दिनानिमित्त गौरव करण्यात आला. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते आदर्श चालक पुरस्कार देऊन विविध क्षेत्रांतील चालकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडसेया, मोटर वाहन निरीक्षक विजय सोळसे, चेंबरच्या पर्यटन समितीचे अध्यक्ष दिलीपसिंह बेनीवाल, चेंबरच्या ट्रान्सपोर्ट समितीचे अध्यक्ष अंजू सिंगल, सारथी श्री फाउंडेशनचे अध्यक्ष भरत परदेशी आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी बेनीवाल, सोळसे, अंजु सिंगल आदींनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास पदाधिकारी व रिक्षाचालक उपस्थित होते.