महाराष्ट्र बँक अफरातफर; संशयितास पोलीस कोठडीमहाराष्ट्र बँक अफरातफर; संशयितास पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2022 01:50 IST2022-07-16T01:50:27+5:302022-07-16T01:50:45+5:30
देवळा तालुक्यातील भऊर येथील महाराष्ट्र बँकेच्या शाखेमध्ये केलेल्या अपहार प्रकरणातील संशयित आरोपी भगवान आहेर यास कळवण न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आता या प्रकरणात अजून कोणाचा सहभाग आहे, अपहार झालेला पैसा नेमका गेला कुठे, अशा अनेक गोष्टी उघडकीस येणार आहेत.

महाराष्ट्र बँक अफरातफर; संशयितास पोलीस कोठडीमहाराष्ट्र बँक अफरातफर; संशयितास पोलीस कोठडी
भऊर : देवळा तालुक्यातील भऊर येथील महाराष्ट्र बँकेच्या शाखेमध्ये केलेल्या अपहार प्रकरणातील संशयित आरोपी भगवान आहेर यास कळवण न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आता या प्रकरणात अजून कोणाचा सहभाग आहे, अपहार झालेला पैसा नेमका गेला कुठे, अशा अनेक गोष्टी उघडकीस येणार आहेत.
सुमारे दीड कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा हा प्रकार समोर आल्यावर गुन्हा दाखल होताच अवघ्या काही तासांत देवळा पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या. त्याला गुरुवारी (दि.१४) सापळा रचून सोग्रस फाटा, ता. चांदवड येथून त्याला अटक करण्यात आली होती. शुक्रवारी (दि. १५) त्याला देवळा पोलिसांनी कळवण न्यायालयात हजर केले असता, सात दिवसांची पोलीस कस्टडी सुनावण्यात आली आहे.
प्रथम दर्शनी सुमारे दीड कोटी रुपयांचा हा अपहार दिसत असला, तरी तक्रारदारांची रीघ बँकेसमोर कायम असल्याने अजून हा आकडा खूप मोठा असल्याचे बोलले जात आहे. इतक्या मोठ्या अपहारात नेमका कुणाकुणाचा सहभाग आहे, हे पोलीस तपासात उघडकीस येणार असून त्याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.