शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

Uddhav Thackeray : "गद्दारांना मतदारच जागा दाखवणार, तुरुंगात कांदे सोलायला पाठवू"; उद्धव ठाकरे कडाडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2024 13:25 IST

Maharashtra Assembly Election 2024 Uddhav Thackeray : ज्या चाळीस जणांनी पक्ष फोडला, चिन्ह चोरले, वडील चोरले अशा शिवसेनेच्या गद्दारांना मतदार त्यांची जागा दाखवतील, असे विधान उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मालेगाव व मनमाड येथे केले. 

मालेगाव / मनमाड : ज्या चाळीस जणांनी पक्ष फोडला, चिन्ह चोरले, वडील चोरले अशा शिवसेनेच्या गद्दारांना मतदार त्यांची जागा दाखवतील, असे विधान उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मालेगाव व मनमाड येथे केले. 

मालेगाव बाह्यचे महाविकास आघाडीचे उमेदवार अद्वय हिरे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर खासदार डॉ. शोभा बच्छाव, माजी मंत्री प्रशांत हिरे, डॉ. अपूर्व हिरे, सेना नेत्या शुभांगी पाटील, राजेंद्र भोसले, मध्यच्या उमेदवार शान ए हिंद उपस्थित होत्या. 

ठाकरे यांनी पालकमंत्री दादा भुसे यांच्यावर टीका करून विकासकामांबात संशय व्यक्त केला. जिल्ह्यातील आमच्या काही पदाधिकाऱ्यांवर बळजबरीने खोट्या केसेस दाखल केल्या आहेत. त्या महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर मागे घेऊ. 

केंद्र सरकारच्या कांदा निर्यात बंदीच्या धोरणावर टीका केली. लाडक्या बहिणींना पैसे वाटून फार मोठे काम केलेले नाही, आधी बहिणींचा आदर करायला शिका, तुम्ही यांच्या सुरक्षेसाठी काय उपाययोजना केल्या असा सवाल उपस्थित केला. गद्दारांनी मतदारसंघाला कलंक लावला. तो दूर करा. माझ्याशी संबंध असल्याचे गद्दार सांगत असले तर सांगतो की, संबंध तोडले. एकाही गद्दाराला पुन्हा उमेदवारी दिलेली नाही. सूत्रसंचालन अॅड. सुधाकर मोरे यांनी केले. 

तुरुंगात कांदे सोलायला पाठवू 

मनमाड येथे नांदगाव मतदारसंघाचे उमेदवार गणेश धात्रक यांच्या प्रचारासाठी झालेल्या सभेत व्यासपीठावर कॉ. डी. एल. कऱ्हाड, माजी आमदार नरेंद्र दराडे, माजी आमदार जगन्नाथराव धात्रक, शिवसेना आमदार मिलिंद नार्वेकर, जयंत दिंडे, योगिता गुप्ता उपस्थित होते. आपल्या भाषणात भावविवश होऊन अश्रू अनावर झालेल्या गणेश धात्रकांना उद्देशून उद्धव ठाकरे म्हणाले, आता रडायचं नाही लढायचं, महाविकास आघाडी सत्तेवर आल्यावर खोट्या केसेस मागे घेऊ, गद्दाराला तुरुंगात कांदा सोलण्यास पाठविल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही, या गद्दाराने राज्यसभा निवडणुकीत सर्वप्रथम गद्दारी केली होती. गद्दाराला उमेदवारी देण्याचे पाप मी केले आहे, या पापाचे प्रायश्चित्त घेण्याची वेळ आली आहे, असे सांगून केंद्र सरकारच्या धोरणामुळे राज्यातील शेतकऱ्यांची स्थिती खालावल्याचा आरोप केला दाखल केला आहे. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४NashikनाशिकUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेनाmalegaon-central-acमालेगाव मध्यmalegaon-outer-acमालेगाव बाह्य