शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
2
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
3
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
5
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
6
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
7
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
8
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
9
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
10
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
11
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
12
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
13
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
14
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
15
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
16
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
17
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
18
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
19
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
20
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष

छगन भुजबळ आणि माणिकराव शिंदे यांच्यात 'कांटे की टक्कर'; विक्रमी मतांचा फायदा कुणाला होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2024 11:47 IST

Maharashtra Assembly Election 2024 And Yeola Assembly Constituency : येवला-लासलगाव विधानसभा मतदारसंघात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सरळ लढत झाली. अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ, तर शरद पवार गटाचे माणिकराव शिंदे यांच्यात 'कांटे की टक्कर' पाहावयास मिळाली.

सुनील गायकवाड

येवला - येवला-लासलगाव विधानसभा मतदारसंघात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सरळ लढत झाली. अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ, तर शरद पवार गटाचे माणिकराव शिंदे यांच्यात 'कांटे की टक्कर' पाहावयास मिळाली. मतदारसंघात ऐनवेळी मनोज जरांगे पाटील यांनी केलेला दौरा आणि मतदानाचा वाढलेला टक्का कुणाच्या पथ्यावर पडणार, याचे गणित येत्या २३ तारखेलाच सुटणार आहे.

मतदारसंघातील रस्ते, मांजरपाडा प्रकल्प, ३८ गाव पाणीपुरवठा योजना, प्रशासकीय इमारती याबरोबरच गावोगाव समाजमंदिरे, पर्यटनस्थळी बांधकामे आदींवर भर दिला. त्या जोरावर भुजबळ २००४, २००९, २०१४, २०१९ असे सलग चारवेळा निवडून आले. प्रत्येकवेळी भुजबळांचे मताधिक्य वाढतच गेले. मात्र, पहिल्या पाच वर्षांतच भुजबळ शिंदे यांच्यात दरी निर्माण झाली. 

शिंदे यांनी २००९ ची निवडणूक भुजबळांच्या विरोधात लढवली. मात्र, त्यावेळी त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. शिंदे पुन्हा आपली शस्त्रे म्यान करीत भुजबळांच्या तंबूत दाखल झाले. आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर शिंदे शरद पवार गटात दाखल होत, त्यांनी शरद पवारांची पहिलीच सभा येवल्यात घेतली. तेव्हाच त्यांनी भुजबळांच्या विरोधात उमेदवारी करण्याचा संकल्प केला होता. त्याला जोड मराठा आरक्षण आंदोलनाची मिळाली. 

मंत्री भुजबळ यांनी मराठा आरक्षणाच्या भूमिकेनंतर विकासकामे हे मुद्दे प्रचारात आणले. मतदारसंघातील हजारो कोटींची कामे त्यांनी मतदारांसमोर ठेवली व मतदानाचा आग्रह केला. विकासकामे व जरांगे फॅक्टरभोवतीच निवडणूक फिरली असल्याने शासनाच्या योजनांचा फारसा गवगवा झाला नाही. ज्येष्ठांच्या पर्यटनाचा मुद्दा तर क्वचितच वापरण्यात आला. तालुक्यातील नगरसुल, अंदरसुल, मुखेड, विंचूर, लासलगाव गटात भुजबळांना वातावरण अनुकूल होते. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४yevla-acयेवलाChhagan Bhujbalछगन भुजबळNashikनाशिकPoliticsराजकारण