त्रिंगलवाडी किल्ल्यावर महाराणा प्रताप जयंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 01:02 IST2021-05-09T21:22:00+5:302021-05-10T01:02:13+5:30

घोटी : हिंदुस्तानचे आराध्यदैवत, देशातील पहिला स्वातंत्र्यसैनिक महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त इगतपुरी तालुक्यातीलच प्रसिद्ध त्रिंगलवाडी या ऐतिहासिक किल्ल्यावर प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले.

Maharana Pratap Jayanti at Tringalwadi Fort | त्रिंगलवाडी किल्ल्यावर महाराणा प्रताप जयंती

इगतपुरी तालुक्यातील त्रिंगलवाडी किल्ल्यावर महाराणा प्रताप जयंती दिनानिमित्त अभिवादन करताना घोटीतील कळसूबाई मंडळाचे कार्यकर्ते.

ठळक मुद्देमहाराणा प्रतापसिंह यांची ४८१ वी जयंती किल्ल्यावर

घोटी : हिंदुस्तानचे आराध्यदैवत, देशातील पहिला स्वातंत्र्यसैनिक महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त इगतपुरी तालुक्यातीलच प्रसिद्ध त्रिंगलवाडी या ऐतिहासिक किल्ल्यावर प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले.

तालुक्यातील गिर्यारोहक टीम तथा कळसूबाई मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी महाराणा प्रतापसिंह यांची ४८१ वी जयंती किल्ल्यावर साधेपणाने जयंती साजरी केली. यावेळी प्रतिमेचे पूजन करून महाराणा प्रताप यांना अभिवादन करून त्यांच्या कार्याला व पराक्रमाला उजाळा देण्यात आला.
या जयंती सोहळ्यात कळसूबाई मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष भगीरथ मराडे, अभिजित कुलकर्णी, काळू भोर, बाळू आरोटे, डॉ. महेंद्र आडोळे, नीलेश पवार, प्रवीण भटाटे, गजानन चव्हाण, सुरेश चव्हाण, उमेश दिवाकर, भाऊसाहेब जोशी, नगमा खलिफा, जानवी भोर, चतुर्थी तोकडे, प्रणव खिंवसरा व इतर गिर्यारोहक सहभागी झाले होते.
 

Web Title: Maharana Pratap Jayanti at Tringalwadi Fort

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.