महाजन यांची मनपातील प्रतिनियुक्ती रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 01:10 IST2018-11-13T01:10:16+5:302018-11-13T01:10:36+5:30

महानगरपालिकेत प्रतिनियुक्तीवर येऊ घातलेले पाहुणे उपजिल्हाधिकारी उन्मेष महाजन यांची बदली शासनाने रद्द केली आहे. महापालिकेतील लोकप्रतिनिधींचा कडाडून होणारा विरोध आणि महाजन हे भाजपातील असंतुष्ट नेते एकनाथ खडसे यांचे निकटवर्तीय असल्याचा बसलेला शिक्का यामुळे ही बदली रद्द झाल्याचे सांगितले जात आहे.

 Mahajan's deputation cancellation | महाजन यांची मनपातील प्रतिनियुक्ती रद्द

महाजन यांची मनपातील प्रतिनियुक्ती रद्द

नाशिक : महानगरपालिकेत प्रतिनियुक्तीवर येऊ घातलेले पाहुणे उपजिल्हाधिकारी उन्मेष महाजन यांची बदली शासनाने रद्द केली आहे. महापालिकेतील लोकप्रतिनिधींचा कडाडून होणारा विरोध आणि महाजन हे भाजपातील असंतुष्ट नेते एकनाथ खडसे यांचे निकटवर्तीय असल्याचा बसलेला शिक्का यामुळे ही बदली रद्द झाल्याचे सांगितले जात आहे.  दरम्यान, आयुक्त तुकाराम मुंढे यांनी महापालिकेच्या सेवेत विविध भागातून आणलेल्या प्रमुख अधिकाऱ्यांची रवानगी मूळ सेवेत करण्यात यावी यासाठी पालकमंत्री गिरीश महाजन यांना साकडे घालण्यात आल्याचे वृत्त आहे. महापालिकेच्या प्रशासनात यापूर्वी लेखा परीक्षक, आरोग्याधिकारी, जीवशास्त्रज्ञ, नगररचना विभागाचे  nमहापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या स्वारस्यातून अधिकारी महापालिकेत प्रतिनियुक्तीवर आणण्यास नगरसेवकांचा विरोध आहे. इतकेच नव्हे तर सध्या प्रतिनियुक्तीवर असलेल्या अधिकाºयांनादेखील मूळ सेवेत पाठविण्याची नगरसेवकांची मागणी असून, ती पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आल्याचे वृत्त आहे.

Web Title:  Mahajan's deputation cancellation