शिवसेवा मंडळाच्या वतीने माघी गणेश जयंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 00:46 IST2021-02-16T00:42:55+5:302021-02-16T00:46:30+5:30

नाशिक : शिवसेना प्रणित शिवसेवा युवक मंडळाच्या वतीने संत गाडगे महाराज चौक, मेनरोड येथे माघी गणेश जयंतीनिमित्त श्री गणपतीची भव्य मूर्ती स्त्रापन करून सकाळी माजी आमदार वसंत गिते यांच्या हस्ते पूजेचे आयोजन करण्यात आले होते.

Maghi Ganesh Jayanti on behalf of Shivseva Mandal | शिवसेवा मंडळाच्या वतीने माघी गणेश जयंती

मंडळाचे संस्थापक विनायक पांडे, अनिता पांडे, माजी आमदार वसंत गिते यांच्या हस्ते पूजेचे आयोजन

ठळक मुद्दे ४ हजारांहून अधिक भाविकांना महाप्रसादाचे वाटप

नाशिक : शिवसेना प्रणित शिवसेवा युवक मंडळाच्या वतीने संत गाडगे महाराज चौक, मेनरोड येथे माघी गणेश जयंतीनिमित्त श्री गणपतीची भव्य मूर्ती स्त्रापन करून सकाळी माजी आमदार वसंत गिते यांच्या हस्ते पूजेचे आयोजन करण्यात आले होते. वेदमंत्रोच्चारात धार्मिक विधी झाल्यानंतर सार्वजनिक आरती झाली, त्यानंतर चौकात आलेल्या सुमारे ४ हजारांहून अधिक भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

यावेळी मंडळाचे संस्थापक विनायक पांडे, अनिता पांडे, अध्यक्ष संदीप कानडे, राजेंद्र देसाई, ऋतुराज पांडे, कुंदन दळे, सचिन बांडे, अनिल क्षत्रिय, संदेश फुले, विशाल भालेकर, दत्ता क्षीरसागर, नीलेश कुसमोडे, सुनील पिंपळे आदींचा सहभाग होता.
(१५ माघी गणेश)

Web Title: Maghi Ganesh Jayanti on behalf of Shivseva Mandal