पाडळी विद्यालयाचे उपकरण राज्य पातळीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2019 22:23 IST2019-12-03T22:22:19+5:302019-12-03T22:23:51+5:30
सिन्नर : अगस्त्या फाउण्डेशनमार्फत आयोजित राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी तालुक्यातील पाडळी येथील पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ‘अल्कोहोल डिटेक्टर’ उपकरणाची निवड झाली आहे. या उपकरणामुळे आता मद्य प्राशन करून वाहन चालविणाऱ्या चालकांवर नियंत्रण ठेवता येणार आहे.

पाडळी येथील पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या अल्कहोल डिटेक्टर उपकरणासह एस. बी. देशमुख, सविता देशमुख, बी. आर. चव्हाण, आर.टी गिरी, टी. के. रेवगडे, सी. बी. शिंदे आदींसह विद्यार्थी.
सिन्नर : अगस्त्या फाउण्डेशनमार्फत आयोजित राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी तालुक्यातील पाडळी येथील पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ‘अल्कोहोल डिटेक्टर’ उपकरणाची निवड झाली आहे. या उपकरणामुळे आता मद्य प्राशन करून वाहन चालविणाऱ्या चालकांवर नियंत्रण ठेवता येणार आहे.
पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयाच्या अल्कोहोल डिटेक्टरमार्फत अपघात नियंत्रण या उपकरणाची जिज्ञासा २०१९ अंतर्गत ४ डिसेंबर रोजी चिपळूण येथे होणाºया राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली आहे. विद्यालयातील सत्यम गोपाल रेवगडे व आशिष पोपट जाधव या विद्यार्थ्यांनी विज्ञान व तंत्रज्ञान अंतर्गत हे उपकरण तयार केले आहे. वाहनांचा होणारा अपघात त्यासाठी कारणीभूत चालकाचा बेसावधपणा व मुख्यता: कारण म्हणजे मद्द्य प्राशन करून वाहन चालविणे म्हणून या विद्यार्थ्यांनी तयार केले आहे.