मका बियाणे घोटाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 01:47 AM2018-06-29T01:47:57+5:302018-06-29T01:48:28+5:30

सटाणा/ताहाराबाद : मका प्रात्यक्षिक प्रकल्पांतर्गत महाबीजकडून शेतकºयांना मोफत वितरित होणारे प्रत्येकी दोन किलो मका बियाणे कृषी सहायकाने परस्पर एका व्यापाºयाला व काही शेतकºयांना दोनशे रुपये प्रतिकिलोने विकल्याचा प्रकार बागलाण तालुक्यातील पिंपळकोठेचे सरपंच किशोर भामरे यांनी गुरुवारी (दि. २८) उघडकीस आणल्याने कृषी विभागासह शेतकºयांमध्ये खळबळ उडाली आहे. या मका घोटाळ्यात वरिष्ठ अधिकारीही सहभागी असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

Maca Seeds Scam | मका बियाणे घोटाळा

मका बियाणे घोटाळा

Next
ठळक मुद्देकृषी सहायकाचा प्रताप : मोफत बियाणांची परस्पर विक्री

सटाणा/ताहाराबाद : मका प्रात्यक्षिक प्रकल्पांतर्गत महाबीजकडून शेतकºयांना मोफत वितरित होणारे प्रत्येकी दोन किलो मका बियाणे कृषी सहायकाने परस्पर एका व्यापाºयाला व काही शेतकºयांना दोनशे रुपये प्रतिकिलोने विकल्याचा प्रकार बागलाण तालुक्यातील पिंपळकोठेचे सरपंच किशोर भामरे यांनी गुरुवारी (दि. २८) उघडकीस आणल्याने कृषी विभागासह शेतकºयांमध्ये खळबळ उडाली आहे. या मका घोटाळ्यात वरिष्ठ अधिकारीही सहभागी असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
धक्कादायक बाब म्हणजे हे प्रकरण अंगलट येत असल्याचे लक्षात येताच संबंधित कृषी सहायकाने प्रकरण दडपण्यासाठी थेट पिंपळकोठे येथे धाव घेत सरपंच किशोर भामरे यांच्याशी हातमिळवणी करण्याचा प्रयत्न केला; मात्र भामरे यांनी शेतकºयांची बाजू लावून धरत हे मका बियाणे घोटाळा प्रकरण थेट प्रसार-माध्यमांच्या प्रतिनिधींना बोलावून घेत कृषी सहायक के.आर. पिठे यांचा भांडाफोड केला.
राज्य शासनाकडून कृषी विभागाच्या माध्यमातून मका प्रात्यक्षिक प्रकल्पांतर्गत शेतकºयांना महाबीजकडून प्रत्येकी दोन किलो मका बियाणे वितरित केले जात आहे.
बागलाण तालुक्यातील पिंपळकोठेचे सरपंच किशोर भामरे यांनी दिलेल्या माहितीनुसार गावाला याच योजनेतून दोन क्विंटल मका बियाणे शेतकºयांना मोफत वितरित करण्यासाठी पाठविले आले होते; मात्र कृषी सहायक के. आर. पिठे यांनी सदर बियाणे शेतकºयांना
मोफत न वाटता पिंपळकोठे येथील काही शेतकरी व बियाणे विके्रत्याशी परस्पर व्यवहार करून दोनशे रुपये प्रतिकिलोप्रमाणे मका बियाणाची विक्र ी करून शासनासह शेतकºयांची मोठी फसवणूक केल्याचा आरोप किशोर भामरे यांनी पत्रकारांशी बोलताना केला आहे. यामुळे बागलाण तालुक्यात खळबळ उडाली आहे.जिल्हाधिकाºयांकडे तक्रार करणार
कृषी सहायक पिठे यांचा मका बियाणे घोटाळा सरपंच किशोर भामरे यांनी उघडकीस आणताच घोटाळेबाज कृषी सहायकाने पिंपळकोठे गाठत सरपंच भामरे यांना आमीष दाखविण्याचा प्रयत्न केला; मात्र भामरे यांनी आमिषाला बळी न पडता हा मका बियाणे घोटाळा समोर आणला. हा घोटाळा नुसता पिंपळकोठेपुरता मर्यादित नसून याची व्याप्ती तालुकाभर असण्याची शक्यता सरपंच भामरे यांनी व्यक्त केली आहे. याबाबत प्रांताधिकारी आणि जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन या घोटाळ्याची तक्र ार करणार असल्याचे भामरे यांनी म्हटले आहे.

Web Title: Maca Seeds Scam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी