शितकड्यावरून उडी मारून आईची मुलासह आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2018 14:12 IST2018-11-23T14:12:30+5:302018-11-23T14:12:56+5:30

सप्तशृंगगड : येथील शिवालय तलाव लगत असलेल्या शितकड्यात आईने मुलासह उडी मारून आत्महत्या केली. अर्चना शरद अहिरे (३५) व जय शरद अहिरे (१५) रा. उगाव .ता.निफाड अशी मायलेकांची नावे आहेत.

 Lying on a cliff, the mother and her son commit suicide | शितकड्यावरून उडी मारून आईची मुलासह आत्महत्या

शितकड्यावरून उडी मारून आईची मुलासह आत्महत्या

सप्तशृंगगड : येथील शिवालय तलाव लगत असलेल्या शितकड्यात आईने मुलासह उडी मारून आत्महत्या केली. अर्चना शरद अहिरे (३५) व जय शरद अहिरे (१५) रा. उगाव .ता.निफाड अशी मायलेकांची नावे आहेत. सप्तश्रृंगगडावर दर्शनासाठी आलेले काही भाविक शितकडा बघण्यासाठी गेले असता त्यांना १५० ते २०० फूट खोल दरीत महिला व मूलगा पडल्याचे दिसून आले. त्यांनी त्वरीत येथील ग्रामस्थांना शितकड्यात कोणी तरी पडल्याचे सांगितल्याने त्वरित ग्रामस्थांनी शितकड्याच्या ठिकाणी धाव घेऊन बघितले असता हा प्रकार उघडकीस आला. गडावरील सामाजिक कार्यकर्ते संदीप बेनके यांनी पोलिसांना ही माहिती कळविली व पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. आज सकाळी येथील तरु ण ग्रामस्थ व पोलीस व पोलीस मित्राद्वारे खोल दरीत उतरून दोरखंडाच्या सहाय्याने त्या दोघांचे मृतदेह काढण्यात आले. दरी खोल असल्याने तरूणाचे व पोलिसांची कसरत झाली. जय अहिरे याच्याकडे भ्रमणध्वनी सापडला असून त्याच्या नातेवाईकांना फोन करून घटनेची माहिती देण्यात आली. मृतदेह रूग्णवाहिकेतून कळवण उपजिल्हा रूग्णालय येथे पाठवण्यात आले. पुढील तपास कळवणचे पोलीस निरीक्षक सुधाकर मांडवकर ,पोलीस उपविभागिय अधिकारी सदाशिव वाघमारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक एस.आय.खाडे., पो.कॉ.योगेश गवळी, पो.कॉ.पी.सी.शिंदे, पो.कॉ.ए.सी.आहीरे, पो.कॉ.पी.सी.घरटे करत आहे.

Web Title:  Lying on a cliff, the mother and her son commit suicide

टॅग्स :Nashikनाशिक