घरफोडीत एक लाख २७ हजारांचा ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2019 01:23 IST2019-09-15T01:22:54+5:302019-09-15T01:23:11+5:30

मालेगाव शहरातील नयापुरा येथे चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून एक लाख दोन हजार रु पयांचे दागिने व रोख २५ हजार रुपये असा एकूण एक लाख २७ हजारांचा ऐवज चोरून नेला.

A lump sum of Rs | घरफोडीत एक लाख २७ हजारांचा ऐवज लंपास

घरफोडीत एक लाख २७ हजारांचा ऐवज लंपास

मालेगाव मध्य : शहरातील नयापुरा येथे चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून एक लाख दोन हजार रु पयांचे दागिने व रोख २५ हजार रुपये असा एकूण एक लाख २७ हजारांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी सादिया शाहीन हुजैर अहमद (४०) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी (दि. १३) सायंकाळी फिर्यादी सादिया शाहीन हुजैर अहमद या त्यांच्या आईवडिलांना भेटण्यासाठी गेल्या होत्या. त्याचा फायदा घेत अज्ञात व्यक्तीने घराचे कुलूप तोडून प्रवेश करीत कपाटात ठेवलेली एक लाख दोन हजार रु पये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने व २५ हजार रुपये रोख असा एकूण एक लाख २७ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.
पोलीस निरीक्षक दिलीपकुमार पारेकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. उपनिरीक्षक अतुल क्षीरसागर तपास करीत आहेत.
साकूर फाट्यावर
अज्ञात व्यक्तीचा मृतदेह
कवडदरा : इगतपुरी तालुक्यातील घोटी-सिन्नर महामार्गावर साकूर फाट्यावरील सार्थक दुकानासमोर अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. या व्यक्तीचे वय साधारण अंदाजे ३५ ते ४० वयोगटातील आहे. सदर व्यक्ती अंगाने मजबूत बांधा, रंग गोरा, नाक सरळ, दाढीचे केस वाढलेले, अंगात लाल जॅकेट असलेला शर्ट, काळी जिन्स असे त्याचे वर्णन असून, त्याचा आजारपणामुळे मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. वाडीवºहे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस निरीक्षक देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक उपनिरीक्षक वाजे, गायकवाड तपास करीत आहेत.

Web Title: A lump sum of Rs