घरफोडीमध्ये ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 00:56 IST2019-05-13T00:53:25+5:302019-05-13T00:56:18+5:30
नाशिक : नाशिक-पुणे महामार्गावरील टागोरनगर येथे बंद फ्लॅटचा कडी-कोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी ४२ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.

घरफोडीमध्ये ऐवज लंपास
ठळक मुद्दे ४२ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.
नाशिक : नाशिक-पुणे महामार्गावरील टागोरनगर येथे बंद फ्लॅटचा कडी-कोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी ४२ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.
श्रद्धा कॉम्प्लेक्समध्ये राहणाऱ्या दीपाली सुभाष नागरे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, १ ते ९ मे दरम्यान ते सहकुटुंब बाहेरगावी फिरायला गेले होते. यावेळी अज्ञात चोरट्याने दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून घरातील सोन्याची कानातील बुगडी, चांदीचे पैंजण, जोडवे, शिक्के, २२ हजार रुपये रोख असा एकूण ४२ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.