नीचांकी १८ रुपये भाव : खर्चही फिटत नसल्याने व्यावसायिक हवालदिल मानोरी परिसरात दुधाचे दर घसरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 00:14 IST2018-05-06T00:14:09+5:302018-05-06T00:14:09+5:30
मानोरी : सध्या दूध व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू असून, दूध उत्पादन बघता दुधाचे दर १० रुपयांपेक्षाही कमी म्हणजे प्रतिलिटर १८ ते १९ रुपये इतका नीचांकी दर मिळत आहे.

नीचांकी १८ रुपये भाव : खर्चही फिटत नसल्याने व्यावसायिक हवालदिल मानोरी परिसरात दुधाचे दर घसरले
मानोरी : सध्या दूध व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू असून, दूध उत्पादन बघता दुधाचे दर १० रुपयांपेक्षाही कमी म्हणजे प्रतिलिटर १८ ते १९ रुपये इतका नीचांकी दर मिळत आहे. त्यामुळे दूध व्यवसाय करणेदेखील परवडेनासे झाले आहेत. दिवसेंदिवस ग्रामीण भागात शेती करणे आवाक्याबाहेर झाले असून, शेतपिकाला लागवड केल्यापासून ते पीक काढेपर्यंत अवाढव्य खर्च करूनही शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडत आहे. त्यातच वाढती महागाई विचारात घेता शेती म्हणजे एक प्रकारे जुगार खेळल्यासारखा प्रकार होत आहे म्हणून ग्रामीण भागात शेतीला पूरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय करण्यास मग्न असतात. गेल्या एक वर्षापासून दुधाच्या दरात दहा रुपयांची घसरण झाली आहे. शासनाने शेतकरी व दूध उत्पादकांचेही मोठी घसरण करून सर्वसामान्य शेतकºयांचे कंबरडे मोडले आहे. सध्याची दूध व्यवसायाची वस्तुस्थिती लक्षात घेता दुधाचा उत्पादन खर्चही भरून निघणे कठीण झाले आहे. दूध स्वस्त, पाणी महाग अशी स्थिती निर्माण झाली आहे. शेतातील कामे जवळपास संपली असून, दूध व्यवसाय टिकविण्यासाठी शेतकºयांनी शेतात जेमतेम पाण्यावर गायींना खाण्यासाठी घास, हिरवे गवत, मका आदी चारा तयार करत आहे. यासाठी खर्च करूनही दुधाचे दर जैसे थेच आहेत. उन्हाची लाट तीव्र असून, घास सुकतो की काय? या भीतीने शेतकरी उन्हाची तीव्रता न बघता शेतात पाणी भरण्यासाठी जात आहे. दूधवाढीसाठी अनेक प्रकारचे औषधे, ढेप, सरकीसारख्या खाद्यवस्तू खरेदी करतात. ढेपीच्या पन्नास किलो पोत्याच्या दर नऊशे पन्नास ते हजार रु पयांपर्यंत आहे. एका गाईला एक ढेपीचे पोते साधारण बारा ते पंधरा दिवस जाते. त्यात गाईचा दवाखाना, बाकी खर्च विचारात घेता दुग्ध व्यवसाय धोक्यात आला असल्याचे शेतकरी सांगत आहेत. येथील दुधाला गुजरात राज्याबरोबर बारामती, सिन्नर आदीसारख्या मोठ्या शहरात दूध निर्यात होत आहे.