वणीत कांद्याची कमी आवक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 00:16 IST2021-06-05T22:56:57+5:302021-06-06T00:16:21+5:30
वणी : मागील आठवड्याच्या तुलनेत कांदा दरात अल्पशी वाढ झाली असून कांदा आवकही कमी झाल्याने कांदा दरात अजून वाढ होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

वणीत कांद्याची कमी आवक
ठळक मुद्दे १८०० रुपये सरासरी प्रति क्विंटलचा दर
वणी : मागील आठवड्याच्या तुलनेत कांदा दरात अल्पशी वाढ झाली असून कांदा आवकही कमी झाल्याने कांदा दरात अजून वाढ होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे.
उपबाजारात शनिवारी (दि. ५) ४९० वाहनांमधून ९ हजार क्विंटल कांद्याची आवक झाली. कमाल २२५० व किमान १४०० तर १८०० रुपये सरासरी प्रति क्विंटलचा दर उत्पादकांना मिळाला.
गेल्या काही दिवसांत दहा हजार क्विंटलपेक्षा जास्त आवक कांद्याची झाली होती. मात्र शनिवारी तुलनात्मक आवक कमी झाल्याचे दिसून आले. दरम्यान, भविष्यात कांदा दरात तेजीच्या वातावरणाचा अंदाज घेत अनेकांनी कांदा चाळीत कांदा साठविण्यास अग्रक्रम दिला आहे.