स्पा सेंटरच्याआड चालणारा कुंटणखाना उद्ध्वस्थ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2019 00:59 IST2019-09-01T00:59:06+5:302019-09-01T00:59:31+5:30
कॉलेजरोडवरील होलमार्क चौकात परिसरातील एका मसाज आणि स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेला कुंटणखाना शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने उद््ध्वस्त केला. या कारवाईत दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून, स्पा सेंटरच्या व्यवस्थापकालाही पोलिसांनी अटक केली आहे.

स्पा सेंटरच्याआड चालणारा कुंटणखाना उद्ध्वस्थ
नाशिक : कॉलेजरोडवरील होलमार्क चौकात परिसरातील एका मसाज आणि स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेला कुंटणखाना शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने उद््ध्वस्त केला. या कारवाईत दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून, स्पा सेंटरच्या व्यवस्थापकालाही पोलिसांनी अटक केली आहे. मात्र कुंटणखाना चालविणारी महिला आणि मुख्य मालक फरार आहेत.
एसके मॉल इमारतीतील बाटा शोरूमच्या वरील तिसऱ्या मजल्यावर स्पा सेंटरच्या आडून अवैध व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. क्राइम ब्रँचच्या पथकाने डमी ग्राहक पाठवून खात्री करून शनिवारी (दि. ३१) छापा मारला. या कारवाईत स्पा सेंटरचा व्यवस्थापक संशयित नागेश देवराज मरीअण्णा (२९) याला ताब्यात घेतले आहे. छाप्यानंतर स्पा सेंटर चालविणारी महिला आणि मुख्य मालक ललित नेपाळ रॉय फरार झाली आहेत, तर दोन मुलींची सुटका करून महिला सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. याप्रकरणी पिटा कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.