भगवान महावीरांचा महामस्तक अभिषेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 00:10 IST2018-04-02T00:10:36+5:302018-04-02T00:10:36+5:30
मालेगाव : कॅम्पातील भगवान महावीर जन्मकल्याणक साजरी करण्यात आली. यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

भगवान महावीरांचा महामस्तक अभिषेक
मालेगाव : कॅम्पातील भगवान महावीर जन्मकल्याणक साजरी करण्यात आली. यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी श्री १००८ चंद्रप्रभु दिगंबर जैन मंदिरात भगवान महावीरांचा महामस्तक अभिषेक करण्यात आला. यावेळी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. मिरवणुकीत भगवंताचे माता-पित्याचा बहुमान प्रकाश पहाडे व प्रतिभा पहाडे यांना मिळाला. तसेच कुंभकलशचा मान अपूर्वा प्रणय पहाडे यांना मिळाला. भगवानजीच्या भुवाजीचा मान कामना पाटणी, नयन लोहाडे, निधी गंगवाल, प्रीती पाटणी, रितीका कासलीवाल यांना मिळाला. अश्वावर बसण्याचा मान हार्दिक पाटणी व भव्य पांडे यांना मिळाला. मिरवणुकीनंतर दिगंबर स्थानकवासी तसेच सकल जैन समाजातील सर्व महिला-पुरुष, युवा-युवती, ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते. महाआरती करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.