भगवान जिव्हेश्वर जन्मोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 17:44 IST2018-08-29T17:44:32+5:302018-08-29T17:44:46+5:30
येवला : स्वकुळ साळी समाजाचे आद्य दैवत भगवान जिव्हेश्वर जन्मोत्सव मोठ्या उत्साहात विविध उपक्र म राबवित साजरा करण्यात आला. यावेळी स्वकुळ साळी समाजातर्फे भगवान जिव्हेश्वर यांच्या चांदीच्या प्रतिमेची मिरवणुक काढण्यात आली.

भगवान जिव्हेश्वर जन्मोत्सव
येवला : स्वकुळ साळी समाजाचे आद्य दैवत भगवान जिव्हेश्वर जन्मोत्सव मोठ्या उत्साहात विविध उपक्र म राबवित साजरा करण्यात आला. यावेळी स्वकुळ साळी समाजातर्फे भगवान जिव्हेश्वर यांच्या चांदीच्या प्रतिमेची मिरवणुक काढण्यात आली. मिरवणुकीमध्ये वेशभुषा केलेल्या दोन मुली घोड्यावर स्वार होऊन रथात भगवान जिव्हेश्वराची प्रतिमा ठेवण्यात आली होती. जय जिव्हेश्वर व हर-हर जिव्हेश्वर अशी मुद्रा असलेली टोपी समाजबांधवांनी परिधान केली होती. महिलांनी टिपरीनृत्यासह विविध कला सादर केल्या.
मिरवणूक मार्गात,ठिकठिकाणी भावसार समाज अध्यक्ष सुनील भावसार,कोष्टी समाजाचे अध्यक्ष मनोज भागवत,जय बजरंग फ्रेंड सर्कलचे अध्यक्ष मंगेश माळोकर, कापसे पैठणी संचालक बाळसाहेब कापसे,यांनी पालखीचे पूजन केले.भगवान जिव्हेश्वर चांदीच्या प्रतिमेची मिरवणुक काढण्यात आली. मिरवणुकीत सर्व समाजबांधव भिगनींनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला.महाप्रसादाचे आयोजन करून सांगता करण्यात आली.