गरवारे पॉइन्टजवळ  कंटेनरचालकाची लुटमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 01:24 IST2021-03-22T01:24:09+5:302021-03-22T01:24:57+5:30

महामार्गावर शनिवारी (दि.१३) मध्यरात्री मुंबईकडे जाणाऱ्या कंटेनरला  गरवारे पॉईन्टजवळ रस्त्यावर वाहनांच्या साहाय्याने रोखत चार अज्ञात चोरट्यांनी कंटेनर चालकाची लुटमार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी अंबड पोलिसांनी  अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल केला आहे.

Looting of container operator near Garware Point | गरवारे पॉइन्टजवळ  कंटेनरचालकाची लुटमार

गरवारे पॉइन्टजवळ  कंटेनरचालकाची लुटमार

ठळक मुद्देपाच हजारांची लूट : चौघांवर गुन्हा दाखल

सिडको : महामार्गावर शनिवारी (दि.१३) मध्यरात्री मुंबईकडे जाणाऱ्या कंटेनरला  गरवारे पॉईन्टजवळ रस्त्यावर वाहनांच्या साहाय्याने रोखत चार अज्ञात चोरट्यांनी कंटेनर चालकाची लुटमार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी अंबड पोलिसांनी 
अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी कंटेनरचालक सुमन दत्ता (२९, रा. कोलकाता) हे नेहमीप्रमाणे त्यांचा कंटेनर (एनएल ०१, ए सी १०६३ ) शनिवारी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास नाशिकमार्गे मुंबईकडे घेत जात असताना अज्ञात चौघां चोरट्यांच्या टोळीने त्यांच्या दुचाकींनी गरवारे पॉईन्ट वळ रस्त्यावर कंटेनर रोखला. यावेळी चौघांनी मिळून कंटेनरचालक दत्ता याच्याकडील रोख रक्कम पाच हजार सातशे रुपये व कागदपत्रे काढुन घेत पोबारा केला 
आहे. 
याप्रकरणी अंबड पोलिसांनी अज्ञात चार चोरट्यांवर सुमन यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास गुन्हे शाखा पोलिस निरीक्षक कमलाकर 
जाधव यांच्या नेतृत्वाखाली 
पोलिस उपनिरीक्षक सोनवणे हे करीत आहेत. महामार्गावर वाहनचालकांना अडवून त्यांची लूट करण्याचे अनेक प्रकार घडले आहेत. सिडको, पंचवटी, टाकळी या ठिकाणी लूटमार होत आहे.

Web Title: Looting of container operator near Garware Point