शहरं
Join us  
Trending Stories
1
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
2
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
3
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
4
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
5
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
6
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
7
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
8
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
9
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
10
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
11
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
12
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
13
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
14
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
15
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
16
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
17
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
18
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
19
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
20
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती

मोटारींच्या काचा फोडून लाखोंचा ऐवज लुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 1:49 AM

शहर व परिसरात मागील काही दिवसांपासून गावगुंडांची दहशत आणि चोरट्यांचा उपद्रव वाढला असून चार पोलीस ठाण्यांच्या हद्दीत पाच मोटारींना चोरट्यांनी लक्ष्य करून तीन लाखांचा ऐवज लुटून पोबारा केला.

नाशिक : शहर व परिसरात मागील काही दिवसांपासून गावगुंडांची दहशत आणि चोरट्यांचा उपद्रव वाढला असून चार पोलीस ठाण्यांच्या हद्दीत पाच मोटारींना चोरट्यांनी लक्ष्य करून तीन लाखांचा ऐवज लुटून पोबारा केला.पहिल्या घटनेत पंडित कॉलनीमध्ये अपार्टमेंटसमोर उभ्या असलेल्या इनोव्हा मोटारीची (एमएच १५ सीव्ही ८१११) चालकाच्या बाजूची काच फोडून काळ्या रंगाची बॅग पळविली. या बॅगेत १ लाख ९५ हजार रुपयांची रोकड लुटली. सोमवारी (दि.१०) दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडली. उमाकांत पुंडलिक शिंदे (४१ रा. कोराटे, ता. दिंडोरी) यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दुसऱ्या घटनेत सिटी सेंटर मॉलसमोर सोमवारी (दि.१०) दुपारी चार वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी सुभाष लक्ष्मणराव दर्वे (५२, रा. राजीवनगर) यांच्या मालकीची स्विफ्ट मोटारीची (एमएच १५ डीएम ०२७०) चालकाच्या बाजूची काच फोडून बॅग घेऊन पळ काढला.बॅगेत २० हजारांचा लिनोव्हाचा आय-३ प्रोसेस, ५०० जीबीचा हार्डडिस्कसह कागदपत्रे गहाळ झाली आहेत. गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तिसºया घटनेत कॉलेजरोडवरील एका हॉटेलच्या परिसरातून चोरट्याने रविवारी (दि.९) रात्री नऊ वाजेच्या सुमारास राहुल प्रकाश जाधव (३७, रा. गंगापूररोड) यांच्या स्कोडा मोटारीची (एमएच १५ एफएफ ११०१) काच फोडली. कारमधून चोरट्याने सुमारे दोन तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, साडेपाच हजारांचे शूजचे दोन जोड, दहा हजार रु पयांची रोख रक्कम, मोबाइल असा एकूण ४५ हजार ५०० रु पयांचा ऐवज चोरट्याने लंपास केला आहे.२५ हजारांची चोरीचौथ्या घटनेत तुपसाखरे लॉन्सजवळील एसएमबीटी क्लिनिकजवळ उभ्या केलेल्या मोटारीची काच फोडून चोरट्याने रोकड असा २५ हजार रु पयांचा ऐवज लंपास केला. ही घटना सोमवारी (दि.१०) मध्यरात्री घडली. याप्रकरणी सौरभ शिवराज निकुंभ (२८, रा. धुळे) यांनी मुंबईनाका पोलीस ठाण्यात चोरीची फिर्याद दाखल केली आहे. पाचवी घटना इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीत राजीवनगर येथे घडली. एका हॉटेल परिसरात उभ्या असलेल्या मोटारीची काच फोडून ११ हजारांची रक्कम, कागदपत्रे लंपास केली.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयDacoityदरोडा