Loot of passenger by rickshaw driver | रिक्षा चालकाकडून प्रवाशाची लूट
रिक्षा चालकाकडून प्रवाशाची लूट

नाशिक : रिक्षाचालकासह इतर दोघांनी प्रवाशाकडीलं रोकड, दागिने, मोबाइल, कपडे असा ऐवज लुटून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात सचिन राजेंद्र जाधव (३८, रा. कामटवाडे) यांनी तिघा संशयितांविरुद्ध चोरीची फिर्याद दाखल केली आहे. सचिन जाधव हे मध्यरात्रीच्या सुमारास त्रिमूर्ती चौकातून रिक्षात बसले.
त्र्यंबकरोड परिसरात आल्यानंतर रिक्षाचालकासह पाठीमागे बसलेल्या त्याच्या दोघा साथीदारांनी सचिन यांच्या तोंडावर पांघरून टाकून १३ हजार २०० रु पयांचा ऐवज लुटून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. घटनेनंतर तिघे संशयित फरार झाले आहेत.

Web Title: Loot of passenger by rickshaw driver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.