बच्चू कडूंच्या दरबारी येवल्याच्या समस्यांचा पाढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2020 00:20 IST2020-11-13T00:20:08+5:302020-11-13T00:20:45+5:30
येवला : तालुक्यातील विविध प्रश्नी येथील प्रहार संघटनेच्या शिष्टमंडळाने औरंगाबाद दौर्यावर असलेल्या राज्यमंत्री बच्चू कडू यांची भेट घेतली.

येवला येथील समस्यांप्रश्नी राज्यमंत्री बच्चू कडू यांना निवेदन देताना प्रहारचे पदाधिकारी.
येवला : तालुक्यातील विविध प्रश्नी येथील प्रहार संघटनेच्या शिष्टमंडळाने औरंगाबाद दौर्यावर असलेल्या राज्यमंत्री बच्चू कडू यांची भेट घेतली. शिष्टमंडळाने तालुक्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या पालखेड डाव्या कालव्याच्या प्रश्नावर राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याकडे गार्हाणे मांडले. यावर लवकरच मंत्रालयात बैठक आयोजित करण्याच्या सूचना राज्यमंत्री कडू यांनी दिल्या.
एरंडगाव येथील पीडित सलेली जलसंपदा विभागाची जागा व्यावसायिकांना गाळे बांधण्यासाठी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करून, महात्मा फुले कर्जमाफी योजनेत तांत्रिक त्रुटीअभावी वंचित राहिलेले सुमारे तीनशे शेतकर्यांची यादीच शिष्टमंडळाने राज्यमंत्री कडू यांच्याकडे सादर केली. यावर लवकरच निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
शिष्टमंडळात प्रहार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश निंबाळकर, तालुकाध्यक्ष हरिभाऊ महाजन, जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष अमोल फरताळे, किरण चरमळ, वसंतराव झांबरे, शंकर गायके, गणेश लोहकरे, ज्ञानेश्वर जगझाप, सचिन पवार, जगदीश गायकवाड, सागर गायकवाड, गोरख निर्मळ, संजय खांदे, अंकुश कदम, दत्तू खकाळे, सागर सुराणा, संतोष रंधे, वाशीम शेख आदी उपस्थित होते.