नाशिककरांनो तुमची रेसिपी झळकू शकते महाराष्ट्राच्या नं. १ चॅनलवर!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2021 11:28 AM2021-06-10T11:28:48+5:302021-06-10T16:47:26+5:30

Favorite Recipe Competition : नाशिकच्या शुभमला स्पर्धेत जिंकवण्यासाठी लोकमत सखी मंचच्या वतीने ‘आवडीच्या रेसिपी स्पर्धे’ चे आयोजन करण्यात आले आहे.

Lokmat Sakhi Manch has organized 'Favorite Recipe Competition' in Nashik | नाशिककरांनो तुमची रेसिपी झळकू शकते महाराष्ट्राच्या नं. १ चॅनलवर!

नाशिककरांनो तुमची रेसिपी झळकू शकते महाराष्ट्राच्या नं. १ चॅनलवर!

Next

नाशिकस्टार प्रवाहवर झळकणाऱ्या ‘फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकेतील इंडियाज बेस्ट कुक स्पर्धेत सहभागी झालेल्या नाशिकच्या शुभमला जिंकवण्यासाठी नाशिककरांना त्यांच्या आवडत्या रेसिपीज पाठवून स्टार प्रवाहवर झळकवण्याची संधी १८ वर्षावरील सर्व महिला आणि पुरुषांना मिळू शकणार आहे.

नाशिकच्या शुभमला स्पर्धेत जिंकवण्यासाठी लोकमत सखी मंचच्या वतीने ‘आवडीच्या रेसिपी स्पर्धे’ चे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे नाशिककरांना या स्पर्धेत सहभाग नोंदवायचा असेल त्यांनी त्यांच्या फेव्हरेट रेसिपीसमवेत स्वत:चा फोटो काढून तो ८५३०६१९९९४ या क्रमांकावर पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यासमवेत स्पर्धकाचे संपूर्ण नाव, आणि रेसिपीचे नाव पाठवायचे आहे. प्रथम विजेत्याचे नाव आणि रेसिपी स्टार प्रवाहवर ‘फुलाला सुगंध मातीचा’ च्या एपिसोडदरम्यान प्रसारीत केले जाणार आहे. स्पर्धेत सहभागासाठी अंतिम तारीख ९ जून आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना पहिले बक्षीस ५०००, दुसरे बक्षीस ३५०० तर तिसरे बक्षीस २००० आणि आणि दोघांना प्रोत्साहनपर १००० रुपयांचे पारितोषिक प्रदान केले जाणार आहे. यास्पर्धेतील विजेते निवडण्याचे सर्व अधिकार लोकमतकडे असतील.

वेबिनार रंगणार १० जूनला

हा वेबिनार १० जूनला दुपारी ४ वाजता होणार आहे. त्यामध्ये सेलिब्रिटी शुभम, किर्ती आणि जीजीअक्का या कलाकारांशी गप्पाटप्पा तसेच नाशिकच्या नामवंत शेफ आरती कटारीया आणि ओमसाई कुकींग क्लासेसच्या सीमा गवारे पाटील या दोघी आपल्याला नाविन्यपूर्ण पदार्थ शिकवणार आहेत. तसेच या वेबिनारमध्ये काही कुकींगसंबंधी प्रश्न विचारले जातील. अचूक उत्तर देणाऱ्यांना बक्षीसदेखील दिले जाणार आहे. या वेबिनारचा स्क्रीनशॉट काढून दिलेल्या नंबरवर पाठविणे आवश्यक आहे. ज्यांनी स्क्रीनशॉट पाठवला त्या सर्वांमधून लकी ड्रॉमार्फत अकरा जणांना आकर्षक भेटवस्तु जिंकण्याची संधी देण्यात येणार आहे.

 

Web Title: Lokmat Sakhi Manch has organized 'Favorite Recipe Competition' in Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app