शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभा निवडणूक: महायुतीतील नाशिकचा उमेदवार उद्यापर्यंत जाहीर करणार- गिरीश महाजन

By धनंजय रिसोडकर | Updated: April 30, 2024 19:26 IST

नाशिकसह दिंडोरीच्या उमेदवारांचा अर्ज गुरुवारी भरणार

धनंजय रिसोडकर, नाशिक: येथील उमेदवारीबाबतचा निर्णय तिन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते मिळून घेणार असून उद्या अर्थात गुरुवारपर्यंत हा निर्णय जाहीर केला जाईल. गुरुवारी रेकॉर्डब्रेक गर्दीसह अर्ज भरण्यात येणार असून त्या दृष्टीने तिन्ही पक्षांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांची जय्यत तयारी असल्याचे भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी पत्रकारांशी साधलेल्या संवादात सांगितले.

भाजपाच्या वसंत स्मृती कार्यालयात झालेल्या महायुतीच्या पदाधिकाऱ्यांसमवेतच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी संवाद साधत होते. यावेळी बोलताना महाजन यांनी नाशिकची उमेदवारी जाहीर करण्यात काहीसा विलंब झाला असला तरी त्यामुळे निकालात फारसा फरक पडणार नाही. नाशिकसह दिंडोरीची जागा गत निवडणुकीप्रमाणेच मोठ्या मताधिक्याने जिंकून या दोन्ही उमेदवारांना दिल्लीत पाठवले जाणार असल्याचेही महाजन यांनी नमूद केले.

नाशिकमधील उमेदवार कोणत्याही पक्षाचा असला आणि कोणतेही नाव असले तरी त्या उमेदवारासाठी किमान २५ हजार पदाधिकारी, कार्यकर्ते मैदानात उतरणार असून विजय आमचाच असल्याचेही महाजन यांनी नमूद केले. नाशिकच्या जागेबाबत राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्याशी चर्चा करण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Girish Mahajanगिरीश महाजनnashik-pcनाशिक