लोहोणेरला स्वाईनफ्लूने शेतकऱ्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2018 04:08 PM2018-10-03T16:08:55+5:302018-10-03T16:09:07+5:30

लोहोणेर : - येथील प्रगतीशील शेतकरी राजेंद्र पोपट गवळी ( परदेशी ) यांचा स्वाईन फ्यूने नाशिक येथे उपचार घेत असताना मृत्यू झाला.

 Lohoner dies of farmer by swine flu | लोहोणेरला स्वाईनफ्लूने शेतकऱ्याचा मृत्यू

लोहोणेरला स्वाईनफ्लूने शेतकऱ्याचा मृत्यू

Next

लोहोणेर : - येथील प्रगतीशील शेतकरी राजेंद्र पोपट गवळी ( परदेशी ) यांचा स्वाईन फ्यूने नाशिक येथे उपचार घेत असताना मृत्यू झाला. राजेंद्र पोपट गवळी (५०) यांना सुरवातीला खोकला सर्दीचा त्रास जाणवू लागला. यावर त्यांनी प्राथमिक उपचारही घेतले मात्र त्यांच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांना नाशिक येथे हलविण्यात आले होते. तेथे त्यांच्या सर्व प्रकारच्या टेस्ट ( तपासण्या ) करण्यात आल्या असता यावेळी त्यांना स्वाईन फ्यु ची लागण झाली असल्याचे निष्पन्न झाले. नाशिक येथे उपचार घेत असताना अखेर सोमवारी सायंकाळी सहा वाजता त्याचे निधन झाले. त्यांच्यावर मंगळवारी दुपारी बारा त्यांच्या मूळगावी लोहोणेर येथे अत्यंत शोकाकुळ वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, सून ,नातवंडे असा परिवार आहे.

Web Title:  Lohoner dies of farmer by swine flu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक