Lohonar Gram Panchayat conducts Bal Gram Sabha | लोहोणेर ग्रामपंचायतीतर्फे बालग्राम सभेचे आयोजन

लोहोणेर येथील जनता विद्यालयात आपला गाव, आपला विकास कार्यक्र मांतर्गत बालग्राम सभेत आपले प्रश्न उपस्थितांना विचारताना विद्यार्थी व व्यासपीठावर उपस्थित मान्यवर.

ठळक मुद्देआपला गाव आपला विकास कार्यक्र मांतर्गत उपक्रम

लोहोणेर : येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या जनता विद्यालयात लोहोणेर ग्रामपंचायतीच्या वतीने आपला गाव, आपला विकास कार्यक्र मांतर्गत बाल ग्रामसभचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी लोहोणेर ग्रामपंचायतीच्या सरपंच जयवंता बच्छाव होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून देवळा पंचायत समितीचे विस्तार अधिकारी भामरे, ग्रामविकास अधिकारी बी. यु. खैरनार आदींसह मुख्याध्यापक आर. एच. भदाणे आण िपर्यवेक्षिका कल्पना काळे व्यासपीठावर उपस्थित होते.
विद्यालयाच्या वतीने सर्व मान्यवरांचा पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला. मुख्याध्यापक आर. एच. भदाणे यांनी कार्यक्र माचे प्रास्ताविक केले. प्रास्ताविकात त्यांनी कार्यक्र माचा उद्देश समजावून सांगितला. त्यानंतर विस्तार अधिकारी जयवंत भामरे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत या कार्यक्र माची सविस्तर माहिती दिली.
पंचवार्षिक योजनेच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या विविध शासकीय योजनांची माहिती त्यांनी यावेळी दिली. त्यानंतर विद्यालयाच्या भावेश महाजन, संकेत चौधरी, गौरव सोनवणे, मानसी जाधव, सिद्धी सूर्यवंशी, निकिता बच्छाव आदी विद्यार्थ्यांनी विविध प्रश्न विचारले.
यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली व खेळीमेळीच्या वातावरणात ही बाल ग्रामसभा संपन्न झाली. सदर कार्यक्र मासाठी लोहोणेर ग्रामपंचायतीचे भूषण आहिरे, दत्ता जाधव आदींसह विद्यालयाचे सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्र माचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन राकेश थोरात यांनी केले.
 

Web Title: Lohonar Gram Panchayat conducts Bal Gram Sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.