प्रवाशांअभावी ‘लालपरी’ आगारातच लॉक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 00:13 IST2020-06-09T21:16:19+5:302020-06-10T00:13:17+5:30
येवला : प्रवाशांअभावी लालपरी आगारातच लॉक झाली आहे. राज्य परिवहन महामंडळाने २२ मेपासून आंतरजिल्हा बससेवा सुरू केली आहे, मात्र प्रवाशांचा प्रतिसाद मिळालेला नाही.

प्रवाशांअभावी ‘लालपरी’ आगारातच लॉक
येवला : प्रवाशांअभावी लालपरी आगारातच लॉक झाली आहे. राज्य परिवहन महामंडळाने २२ मेपासून आंतरजिल्हा बससेवा सुरू केली आहे, मात्र प्रवाशांचा प्रतिसाद मिळालेला नाही.
येवला आगाराने येवला-नांदगाव, येवला-लासलगाव, येवला-निफाड, येवला-मनमाड अशा प्रत्येकी दोन म्हणजे एकूण आठ तर येऊन-जाऊन सोळा फेऱ्या करण्याचे नियोजन केले. मात्र, प्रवासीवर्गाच्या प्रतिसादाअभावी आजपर्यंत लालपरी रस्त्यावर धावलीच नाही. शहरासह ग्रामीण भागातही कोरोनाबाधित आढळून येत असल्याच्या पाशर््वभूमीवर फक्त दोन बसेसच्या माध्यमातून सोळा फेºया करण्याचे नियोजन आगाराने केले आहे. नांदगाव, लासलगाव, निफाड, येवला-मनमाड अशा प्रत्येकी दोन म्हणजे एकूण आठ फेऱ्यांचे करण्याचे नियोजन आगाराने केले आहे.