त्र्यंबकेश्वर शहरात पुन्हा चौदा दिवस लॉकडाऊन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2020 00:49 IST2020-07-17T20:05:18+5:302020-07-18T00:49:45+5:30
त्र्यंबकेश्वर : शहरात पुन्हा एकदा १४ दिवस लॉकडाऊन करण्यात आले आहे. तालुक्यात कोरोनाचे संक्रमण वाढू लागल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी यांच्या नेतृत्वाखाली गावातील दहा कंटेन्मेंट झोनमध्ये तसेच कोविड केअर सेंटरला भेट देण्यात आली.

त्र्यंबकेश्वर शहरात पुन्हा चौदा दिवस लॉकडाऊन
त्र्यंबकेश्वर : शहरात पुन्हा एकदा १४ दिवस लॉकडाऊन करण्यात आले आहे. तालुक्यात कोरोनाचे संक्रमण वाढू लागल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी यांच्या नेतृत्वाखाली गावातील दहा कंटेन्मेंट झोनमध्ये तसेच कोविड केअर सेंटरला भेट देण्यात आली. यावेळी प्रांताधिकारी तेजस चव्हाण, तहसीलदार दीपक गिरासे, मुख्याधिकारी संजय जाधव, उपजिल्हा रु ग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. मंदाकिनी बर्वे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश मोरे, श्री स्वामी समर्थ केंद्रातील कोविड केअर सेंटरच्या नोडल अधिकारी डॉ. रेखा सोनवणे, डॉ. धनंजय गायके डॉ. अभिजित कपाटे आदी यावेळी उपस्थित होते.
सलग तीन महिने तालुका कोरोनापासून दूर ठेवण्यात प्रशासनाला यश आले होते. मात्र, २४ जून रोजी हरसूल येथे पहिला पॉझिटिव्ह रु ग्ण आढळल्यानंतर ही शृंखला जी सुरू झाली ती आजपर्यंत कायम आहे. एका जणाचा मृत्यू झाला आहे. हिरामण ठाकरे व त्यांचे सहकारी अमोल दोंदे, नितीन शिंदे, किशन मैडा आदी शहरातील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. हरसूल कोरोनामुक्त हरसूल येथील ग्रामपंचायत प्रशासनाने तहसीलदार दीपक गिरासे, गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे, सहायक पोलीस निरीक्षक विशाल टकले आदींच्या सहकार्याने महिनाभरात योग्य निर्णय समन्वय साधून नियोजन करून हरसूल गाव कोरोनामुक्त केले आहे. पण त्र्यंबकेश्वरला सर्व यंत्रणा कोरोनाची साखळी तोडण्यास अद्याप अयशस्वी आहे. दि. १६ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत तालुक्यात आढळून आलेल्या एकूण रु ग्णांची संख्या ५३ झाली आहे. त्यात नगर परिषद हद्दीत २५ तर जिल्हा परिषद क्षेत्रात २८ रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत २७ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.