शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
4
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
5
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
6
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
7
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
8
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
9
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
10
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
11
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?
12
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
13
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
14
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
15
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
16
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
17
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
18
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
19
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
20
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच

लॉकडाऊन : २५० गोरगरीब कुटुंबांची ‘खिदमत’; मोफत दिला किराणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2020 13:22 IST

मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी पडत आहेत. समाजातील दानशूरांनी पुढे येऊन संस्थेला आर्थिक मदतीचा हात द्यावा, जेणेकरून आगामी काळातसुध्दा अशाप्रकारे गरजूंची सेवा करता येऊ शकेल.

ठळक मुद्देसमाजामधील सधन लोकांशी संपर्क सुरू पुन्हा गोरगरीब गरजूंची ‘खिदमत’ सुरू केली जाईलएक महिन्याचा किराणा प्रत्येकी एका कुटुंबापर्यंत

नाशिक : ‘खिदमत’ तसा उर्दू शब्द या शब्दाचा मराठीत अर्थ सेवा असा होतो. या शब्दाचा समर्पक वापर करत जुने नाशिकमधील स्वयंसेवी संस्था खिदमत फाउण्डेशनद्वारे कोरोना पार्श्वभूमीवर पाळण्यात येणाऱ्या लॉकडाऊनच्या काळात २५० गरजु कुटुंबांपर्यंत किराणा माल पोहचविण्यास या संस्थेच्या स्वयंसेवकांना यश आले आहे.‘अन्न वाचवा, जीवन वाचवा’ हे या संस्थेचे घोषवाक्य आहे. शहर-ए-काझी सय्यद मोईजोद्दीन, नायब काजी एजाज सय्यद यांच्या नेतृत्वाखाली शहरात मागील काही महिन्यांपासून खिदमत फाउण्डेशन नाशिक ही संस्था गोरगरीब भुकेलेल्यांची भूक भागविण्यासाठी अविरतपणे झटत आहेत. केवळ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घोषित लॉकडाऊनच्या काळातच नव्हे तर या संस्थेमार्फत विविध औचित्य साधत यापुर्वी बेघर, निराश्रीत उघड्यावर वास्तव्य करणाऱ्यांपर्यंत जेवणाचे डबे पोहचविण्याचा उपक्रम राबविण्यात आला आहे. कोरोना आजाराला प्रतिबंध घालण्यासाठी संपुर्ण देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर गोरगरीब हातावरील मोलमजुरी करणाºयांचा रोजगार ठप्प झाला आहे. कामे बंद झाल्याने त्यांना चूल पेटविण्याची भ्रांत पडली आहे. कोरोनापासून संरक्षणासाठी घरात बसण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.‘कोरोनापासून बचावासाठी घरातच थांबा...’गरजुंचा शोध घेऊन त्यांच्या घरापर्यंत पोहचून खिदमत फाउण्डेशनचे स्वयंसेवक तांदूळ, विविध प्रकारच्या डाळी, गोडतेलाच्या पिशव्या, साखर,चहापावडर पोहचविण्याचा प्रयत्न करत आहेत. मागील चार ते पाच दिवसांपासून या स्वयंसेवकांची अशी ‘खिदमत’ सुरू आहे. सोशलमिडियाच्या माध्यमातून काजी यांनी समाजातील दानशूरांनाही आर्थिक मदतीचे आवाहन केले आहे. समाजाकडून येणा-या आर्थिक दानच्या रकमेतून किराणा मालाची खरेदी करुन ही संस्था गोरगरीब कुटुंबांपर्यंत ते पोहचविण्यासाठी प्रयत्नशील आहे. एक महिन्याचा किराणा प्रत्येकी एका कुटुंबापर्यंत पोहचविल्याचा दावा संयोजकांनी केला आहे. नागरिकांनी घराबाहेर पडू नये, जेणेकरुन कोरोनाचा कोणीही बळी ठरणार नाही, असे काजी म्हणाले.--मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी पडत आहेत. समाजातील दानशूरांनी पुढे येऊन संस्थेपर्यंत आर्थिक मदतीचा हात द्यावा, जेणेकरून आगामी काळातसुध्दा संस्थेला अशाप्रकारे गरजूंची सेवा करता येऊ शकेल. अडीचशे कुटुंबांना महिनाभर पुरेल इतक्या प्रमाणात आवश्यक किराणा माल पोहचविला आहे. समाजामधील सधन लोकांशी संपर्क सुरू असून पुरेशा प्रमाणात आर्थिक रक्कम जमा होताच पुन्हा गोरगरीब गरजूंची ‘खिदमत’ सुरू केली जाईल.- एजाज काजी, अध्यक्ष, खिदमत फाउण्डेशन, नाशिक

टॅग्स :NashikनाशिकCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसBeggerभिकारी