द्राक्ष निर्यातीला लॉक डाऊनचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2020 14:59 IST2020-03-27T14:55:22+5:302020-03-27T14:59:23+5:30
नाशिक- द्राक्ष पंढरी असलेल्या नाशिक जिल्ह्यात द्राक्षाचा हंगाम संपण्यात आला असताना कोरोनाचा फटका बसला आहे. देशभरात लॉक डाऊन आणि संचारबंदी असल्याने मजुर मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे हजारो मेट्रीक टन द्राक्षाचे पुढे काय करायचे असा प्रश्न उत्पादकांसमोर निर्माण झाला आहे.

द्राक्ष निर्यातीला लॉक डाऊनचा फटका
नाशिक- द्राक्ष पंढरी असलेल्या नाशिक जिल्ह्यात द्राक्षाचा हंगाम संपण्यात आला असताना कोरोनाचा फटका बसला आहे. देशभरात लॉक डाऊन आणि संचारबंदी असल्याने मजुर मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे हजारो मेट्रीक टन द्राक्षाचे पुढे काय करायचे असा प्रश्न उत्पादकांसमोर निर्माण झाला आहे.
नाशिक जिल्ह्यातील द्राक्षे निर्यातक्षम असून ती मोठ्या प्रमाणात विदेशात पाठविली जातात. गेल्या २३ मार्च पर्यंत ५ हजार ७८६ कंटेनरमधून ७७ हजार ५२५ मेट्रीक टन द्राक्षाची निर्यात युरोपात झाली आहे. परंतु नंतर कोरोनाचा फटका बसला आहे. आधी राज्यात आणि नंतर देशभरात लॉक डाऊन करण्यात आले असून संचारबंदी लागु करण्यात आल्याने द्राक्षासाठी मजूर मिळणे कठीण झाले आहे. द्राक्ष बागायतदारांकडे असलेले मजुर भीतीपोटी निघून गेले आहेत. द्राक्ष काढण्याबरोबरच पॅकेजींगसाठी देखील कामगार लागतात. मात्र संचारबंदीमुळे पाच पेक्षा अधिक कामगार जमण्यास परवानगी नसल्याने त्याची देखील अडचण निर्माण झाली आहे देशात किंवा अन्य देशात निर्यात करायची असेल तर कंटेनरची गरज असते. शासकिय परवानग्या देखील घेतल्यानंतर त्याची मुळ कागदपत्रे ठिकठिकाणी तपासली जातात.
संचारबंदीमुळे हे सर्व अशक्य होत आहे. तर दुसरीकडे देशांतर्गत लॉक डाऊन असल्याने देशांतर्गत माल पाठविणे अशक्य झाले आहे. राज्य शासनाने यात लक्ष घालावे आणि किमान परवानग्यांबरोबरच कृषी उद्योगसाठी पाच मजुर- कामगारांची अट शिथील करावी अशी मागणी द्राक्ष उत्पादकांनी केली आहे.