दरवाजाचे कुलूप तोडून घरफोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2019 00:35 IST2019-11-08T22:59:52+5:302019-11-09T00:35:49+5:30
गंगापूर गावातील शिवाजीनगर परिसरात श्रीकृष्ण मंदिराजवळील दिशा हाइट्स येथे २९ आॅक्टोबर २०१९ रोजी झालेल्या घरफोडीत अज्ञात चोरट्यांनी ३५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

दरवाजाचे कुलूप तोडून घरफोडी
नाशिक : गंगापूर गावातील शिवाजीनगर परिसरात श्रीकृष्ण मंदिराजवळील दिशा हाइट्स येथे २९ आॅक्टोबर २०१९ रोजी झालेल्या घरफोडीत अज्ञात चोरट्यांनी ३५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
याप्रकरणी शिवाजीनगरच्या दिलीप खैरनार (४०) यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, त्यांच्या राहत्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी प्रवेश केला. कपाटात ठेवलेली रोकडसह सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण ३५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी गंगापूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.