शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
2
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
3
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
4
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
5
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
6
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
7
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
8
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
9
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
10
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
11
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
12
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
13
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
14
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
15
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
16
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
17
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
18
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
19
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
20
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...

भरधाव वाहनाने बिबट्याच्या बछड्यांना पहाटे चिरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2019 13:38 IST

पहाटेच्या सुमारास भाजीपाला वाहतूक करणा-या एका अज्ञात वाहनाने बछड्यांचा चिरडल्याचा अंदाज वनविभागाच्या सुत्रांनी वर्तविला आहे. त्यादिशेने वनपरिक्षेत्रीय अधिकारी सोनवणे यांनी तपासाला गती दिली आहे. मृत बछड्यांचे पशुवैद्यकिय अधिका-यांनी शवविच्छेदन केले.

ठळक मुद्देया भागातील ग्रामस्थांनी खबरदारी घेण्याचे आवाहनबिबट्याच्या दोन बछड्यांचा अंत झाला.

नाशिक : ‘रोडकिल’च्या घटना थांबता थांबत नसून महामार्गांवर वन्यजीवांचा अपघाती मृत्यूच्या घटना घडत असताना बेदरकारपणे भरधाव वाहने चालविण्याच्या प्रमाण गावपातळीवरील अंतर्गत रस्त्यांवरही वाढत असल्यामुळे सिन्नर तालुक्यातील डुबेरे-सोनारी रस्त्यावर एका भरधाव वाहनाने सोमवारी पहाटेच्या सुमारास आपल्या आईसोबत रस्ता ओलांडणाऱ्या बिबट्याच्या दोघा बछड्यांना चिरडल्याची दुर्दैवी घटना सकाळी उघडकीस आली.रस्त्यांवरून वाहने चालविताना रस्ता सुरक्षा महत्त्वाची असून याबाबत सातत्याने प्रादेशिक परिवहन विभागापासून सर्वच पोलीस दल, वनविभागाकडून जनजागृती केली जात आहे; मात्र भरधाव वेगाने बेदरकारपणे वाहने चालविण्याचे प्रमाण कमी होत नसल्यामुळे रस्त्यांवर अपघातात माणसांसह वन्यप्राण्यांनाही आपले प्राण गमवावे लागत आहे. सिन्नर तालुक्यातील डुबेरे-सोनारी गावाकडे जाणा-या रस्त्यावर अपघातात साधारणत: सहा महिन्यांच्या बिबट्याच्या दोन बछड्यांचा अंत झाला. या अपघातात सुदैवाने बिबट मादी आणि तिचा एक बछडा बालंबाल बचावल्याची माहिती वनविभागाच्या सुत्रांनी दिली आहे. अपघातानंतर मादी आणि पिल्लू याच परिसरात भीतीने दडून बसल्याचे गावकऱ्यांनी वनविभागाला सांगितले. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून या भागात वनविभागाच्या सिन्नर वनपरिक्षेत्र अधिकारी प्रवीण सोनवणे यांनी वनरक्षक, वनपाल यांना गस्तीच्या सूचना दिल्या आहेत. शेतापासून शेतकºयांनी लांब अंतरावर थांबावे, असे आवाहन केले आहे. बिबट मादी आक्रमक होऊन चवताळून अचानकपणे हल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या भागातील ग्रामस्थांनी खबरदारी घेण्याचे आवाहन उपवनसंरक्षक शिवाजी फुले यांनी केले आहे.

अज्ञात वाहनाचा तपास सुरू पहाटेच्या सुमारास भाजीपाला वाहतूक करणा-या एका अज्ञात वाहनाने बछड्यांचा चिरडल्याचा अंदाज वनविभागाच्या सुत्रांनी वर्तविला आहे. त्यादिशेने वनपरिक्षेत्रीय अधिकारी सोनवणे यांनी तपासाला गती दिली आहे. मृत बछड्यांचे पशुवैद्यकिय अधिका-यांनी शवविच्छेदन केले. त्यानंतर वनउद्यानात त्यांच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

टॅग्स :forest departmentवनविभागroad safetyरस्ते सुरक्षाroad transportरस्ते वाहतूकleopardबिबट्याDeathमृत्यूAccidentअपघातNashikनाशिक