शहरं
Join us  
Trending Stories
1
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नक्की कोणते द्रव पाजायचा?
2
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
3
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
4
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
5
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
6
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
7
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
8
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
9
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
10
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
11
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
12
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
13
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
14
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
15
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
16
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
17
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
18
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
19
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
20
जांभळाला सोन्याचा भाव, किरकोळमध्ये ५०० रुपये किलो; ३०० ते ४०० रुपयांचा घाऊक बाजारात भाव
Daily Top 2Weekly Top 5

पशुधन अधिकारी लाच घेताना जाळ्यात

By admin | Updated: October 13, 2015 23:50 IST

पशुधन अधिकारी लाच घेताना जाळ्यात

सिन्नर : मध्यस्थामार्फत दीड हजार रुपयांची लाच घेणाऱ्या येथील पशुधन विकास अधिकाऱ्याला लाच प्रतिबंधक खात्याच्या पथकाने अटक केली आहे. मंगळवारी दुपारी पावणेदोन वाजेच्या सुमारास सदर कारवाई करण्यात आली. ४ आॅक्टोबर रोजी येथील एका शेतकऱ्याची गाय वीज पडून ठार झाली. मृत गायीचे शवविच्छेदन येथील पशुवैद्यकीय दवाखान्यातील पशुधन विकास अधिकारी मानसिंग गुलाबराव शिसोदे यांनी केले होते. सदर शेतकऱ्याला शासनाचा आपत्कालीन निधी मिळवण्यासाठी मृत गायीचा शवविच्छेदन अहवाल महसूल खात्याकडे देणे गरजेचे होते. शवविच्छेदन अहवाल देण्यासाठी शिसोदे यांनी शेतकऱ्याकडे दोन हजार रुपयांची लाच मागितली होती. शेतकऱ्याने आपल्याकडे पाचशे रुपये असल्याचे सांगितले होते. त्यावेळी शिसोदे यांनी पाचशे रुपये घेऊन दीड हजार रुपये नंतर आणून दे असे सांगितले होते. लाच प्रतिबंधक खात्याचे पोलीस अधीक्षक डॉ. दिगंबर प्रधान यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, हवालदार विकास कंदीलकर, ढुमणे, पवार यांनी सापळा रचला होता. या प्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. (वार्ताहर)