नाशिक मनपाच्या ऑनलाइन सभेत नगरसेवकाचे प्रभागातून 'लाईव्ह' आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2020 13:48 IST2020-09-15T13:41:33+5:302020-09-15T13:48:58+5:30
पावसामुळे शहरात आणि विशेषतः गंगापूर रोडवर खड्डे पडले आहेत. ते कधी बुजविणार असा प्रश्न त्यांनी केला.

नाशिक मनपाच्या ऑनलाइन सभेत नगरसेवकाचे प्रभागातून 'लाईव्ह' आंदोलन
नाशिक- कोरोनामुळे नाशिक महापालिकेची महासभा ऑनलाइन होत असली तरी प्रभागातून एका नगरसेवकाने थेट लाईव्ह आंदोलन केले. शिवसेनेचे संतोष गायकवाड यांनी या ऑनलाइन बैठकीत सहभाग घेताना नाशिकच्या गंगापूर रोडवरील नवरचना स्कुल येथे खड्ड्या संदर्भात आंदोलन सुरू केले. या आंदोलनात त्यांच्या बरोबर अन्य नागरिक देखील सहभागी झाले होते.
पावसामुळे शहरात आणि विशेषतः गंगापूर रोडवर खड्डे पडले आहेत. ते कधी बुजविणार असा प्रश्न त्यांनी केला. कोरोनामुळे महापालिकेच्या सर्व सभा सध्या ऑनलाइन पद्धतीने सुरू आहेत. नगरसेवकांना या सभेत ऑनलाइन सहभागी होता येते हीच संधी साधून गायकवाड यांनी आंदोलन करताना या भागातील खड्डे सर्व नगरसेवक आणि प्रशासनाला दाखवून अभिनव आंदोलन केले.
महत्त्वाच्या बातम्या
"सरकारने विवेकबुद्धी गहाण ठेवलीय काय?, हे सरकार आहे की तिघाडीची ईस्ट इंडिया कंपनी?"
डेटिंग वेबसाईट्सद्वारे मोठा 'गेम', हॅकर्सनी चोरला लाखो युजर्सचा डेटा
तरुणांसाठी सुवर्णसंधी! 'ही' ई-कॉमर्स कंपनी देणार तब्बल एक लाख लोकांना नोकरी
जय जिजाऊ, जय शिवराय! योगी सरकारच्या 'त्या' निर्णयावर फडणवीसांचं खास ट्विट, म्हणाले...