तीसगाव शाळेस शिक्षकांकडून साहित्य भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 00:59 IST2019-11-18T00:58:40+5:302019-11-18T00:59:03+5:30
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तीसगाव येथील शिक्षकांनी बालदिनानिमित्त शाळेला शालेय पोषण आहार शिजवण्यासाठी आवश्यक असलेले पातेले, गॅस शेगडी व इतर साहित्य मुख्याध्यापकांकडे सुपुर्द केले.

तिसगाव शाळेला शिक्षकांनी भेट दिलेले साहित्य.
दिंडोरी : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तीसगाव येथील शिक्षकांनी बालदिनानिमित्त शाळेला
शालेय पोषण आहार शिजवण्यासाठी आवश्यक
असलेले पातेले, गॅस शेगडी व इतर साहित्य मुख्याध्यापकांकडे सुपुर्द केले.
याप्रसंगी व्यवस्थापन समिती अध्यक्ष शरद भुरकूड, मुख्याध्यापक तुकाराम राऊत, पदवीधर
शिक्षक शरफोद्दीन शेख, रावसाहेब जाधव, संजय देवरे, बाळू
पवार, प्रमोद देवरे, वहिदा
शेख, ताईबाई आहिरे, चंद्रकांत सोनवणे, यादव बागुल, शोभा चौधरी, मीनाक्षी पानडगळे,
संगीता बागुल, रूपाली पिठे, कांता जाधव, पुष्पा बागुल, दीक्षा
गवारे, अमोल भगरे आदी उपस्थित होते.