साहित्य परिषदेतर्फे सत्कार सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2019 00:15 IST2019-10-31T00:15:15+5:302019-10-31T00:15:33+5:30

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या नाशिकरोड शाखेतर्फे जेलरोडच्या गणेश व्यायामशाळा सभागृहात दहावीत मराठीत प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.

 A Literary Conference felicitation ceremony | साहित्य परिषदेतर्फे सत्कार सोहळा

साहित्य परिषदेतर्फे सत्कार सोहळा

नाशिकरोड : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या नाशिकरोड शाखेतर्फे जेलरोडच्या गणेश व्यायामशाळा सभागृहात दहावीत मराठीत प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य भाऊसाहेब उपस्थित होते. व्यासपीठावर कार्याध्यक्ष उन्मेष गायधनी, उपाध्यक्ष दत्ता गायकवाड, रवींद्र मालुंजकर, शिवाजी म्हस्के, वसंत पाटील, प्रशांत केंदाळे, कामिनी तनपुरे, सुरेखा गणोरे, रमेश औटे, के. मा. मोरे आदी उपस्थित होते.
यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते नाशिकरोडच्या साठ शाळांमधील मराठी, उर्दू, सिंधी, हिंदी, इंग्रजी माध्यमातील प्रथम आलेल्या ६७ विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्राचार्य मनीषा विसपुते यांच्या मार्गदर्शनाखाली समता समाज विकास संस्थेच्या वाचनालयाने ग्रंथ प्रदर्शन भरवले होते. प्रास्ताविक मंगला सातभाई व स्वागत योगेश कापडणीस यांनी केले. पाहुण्यांचा परिचय वर्षा देशमुख यांनी करून दिला. सूत्रसंचलन दशरथ लोखंडे व आभार शरद मोरे यांनी मानले.

Web Title:  A Literary Conference felicitation ceremony