महानगरातील १३५ दुकानांमधून मद्यविक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2020 00:00 IST2020-05-08T23:26:28+5:302020-05-09T00:00:59+5:30
नाशिक : शहर व परिसरातील १३५ मद्यविक्रीच्या दुकानांमधून शुक्रवारी मद्यविक्रीला जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार व राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नियमांचे पालन करत प्रारंभ करण्यात आला. तर जिल्ह्यात कंटेन्मेंट झोनमधील १४५ दुकाने वगळता २३७ दुकाने सुरू झाली.

महानगरातील १३५ दुकानांमधून मद्यविक्री
नाशिक : शहर व परिसरातील १३५ मद्यविक्रीच्या दुकानांमधून शुक्रवारी मद्यविक्रीला जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार व राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नियमांचे पालन करत प्रारंभ करण्यात आला. तर जिल्ह्यात कंटेन्मेंट झोनमधील १४५ दुकाने वगळता २३७ दुकाने सुरू झाली.
शुक्रवारी (दि.८) दिवसभरात हजारो लिटर मद्याची विक्री होऊन सुमारे दोन कोटी रुपयांची उलाढाल झाली. यात देशी-विदेशी मद्यासह बिअर आणि वाइनचाही समावेश आहे. दिवसभर झालेल्या विक्रीत विदेशीपेक्षा देशी दारू वरचढ ठरल्याचे बोलले जात आहे.
जिल्ह्यातील मद्याचा वर्षाचा खप राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे लिटरमध्ये येत असतो. त्यात वर्षात देशी दारूची विक्री साधारण एक कोटी ८३ लाख लिटर इतकी असते. विदेशी मद्याची विक्री ८८ लाख लिटरच्या आसपास होते.
त्याचप्रमाणे बिअरची विक्री एक कोटी २४ लिटर होत असते. या सर्वांमध्ये वाइनची सहा लाख लिटरच्या आसपास सर्वांत कमी विक्री होते. गेल्या आर्थिक वर्षात राज्य उत्पादन शुल्क विभागाला नाशिक जिल्ह्यातून मार्चअखेर दोन हजार ८१३ कोटी ९३ लाख ९८ हजारांचे उत्पन्न मिळाले होते. नागरिकांनी मिळालेल्या संधीचा फायदा उठवत खरेदीसाठी रांगा लावल्या.