दुष्काळ निवारणासाठी दुवा : ईदगाह मैदानावरून पर्जन्यवृष्टीसाठी ‘अल्लाह’च्या दरबारी साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 12:04 IST2019-06-05T11:54:47+5:302019-06-05T12:04:28+5:30
निमित्त होते, रमजान ईदच्या विशेष सामुहिक नमाजपठण सोहळ्याचे. बुधवारी (दि.५) ऐतिहासिक शहाजहांनी ईदगाह मैदानावर अभूतपुर्व उत्साहात पारंपरिक पध्दतीने खतीब-ए-शहर हाफीज हिसामुद्दीन अशरफी यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली नाशिककर समाजबांधवांनी ईदचे नमाजपठण केले.

दुष्काळ निवारणासाठी दुवा : ईदगाह मैदानावरून पर्जन्यवृष्टीसाठी ‘अल्लाह’च्या दरबारी साकडे
नाशिक : ‘ऐ अल्लाह जहां सुका गिरा हैं, वहा अपना खुसुसी फज्ल नाजील फरमा, नफा देणेवाली अब्रे रहमत का नुजूल फरमा’, ‘हमारे मुल्क में अम्न-ओ-अमान अता फरमा, और किसान खेत खुशहाली से भर दे, मौला जल्द से जल्द बारीश का नुजुल फरमा दें’ अशा शब्दांत ‘ईद-उल-फित्र’च्या औचित्यावर शहरातील शहाजहांनी ईदगाह मैदानावरून हजारो मुस्लीम बांधवांनी सर्वश्रेष्ठ ‘अल्लाह’च्या दरबारी समाधानकारक पर्जन्यवृष्टी राष्ट्रीय एकात्मता अखंडितपणे जोपासली जावी, यासाठी खास दुआ मागितली.