बलात्कार करणाऱ्यास जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2019 01:06 IST2019-08-20T23:25:33+5:302019-08-21T01:06:16+5:30

बागलाण तालुक्यातील ताहाराबाद येथील मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी राजेशभाई गमजाभाई इंदाईत (३८, रा. मोरझिरा, ता. अहवा, जि. डांग) यास जिल्हा व अपर सत्र न्यायाधीश बी. एस. महाजन यांनी दहा वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठाविली.

Lifetime for the rapist | बलात्कार करणाऱ्यास जन्मठेप

बलात्कार करणाऱ्यास जन्मठेप

मालेगाव : बागलाण तालुक्यातील ताहाराबाद येथील मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी राजेशभाई गमजाभाई इंदाईत (३८, रा. मोरझिरा, ता. अहवा, जि. डांग) यास जिल्हा व अपर सत्र न्यायाधीश बी. एस. महाजन यांनी दहा वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठाविली.
ताहाराबाद येथे १५ जून २०१४ रोजी आरोपी राजेशभाई गमजाभाई इंदाईत (३८) याने अल्पवयीन मुलीस झोपेतून उचलून जवळच्या सरकारी दवाखान्यामागे नेले. तिला मारहाण करुन तिच्यावर बलात्कार करून पळून गेला. याप्रकरणी जायखेडा पोलिसांनी आरोपीस अटक करुन मालेगाव सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. अतिरिक्त सहायक सरकारी वकील एस. के. सोनवणे यांनी सरकार पक्षातर्फे नऊ साक्षीदार तपासले.

आरोपीविरुद्ध गुन्हा शाबीत झाला. आरोपी राजेशभाई इंदाईत याचेविरुद्ध जायखेडा पोलिसांत दोन गुन्हे दाखल आहेत. गुजरात राज्यातील गुन्ह्यातदेखील यापूर्वी आरोपीविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल होऊन शिक्षा झाली आहे. आरोपीविरोधात देवळा पोलीस ठाण्यातदेखील बलात्काराचा गुन्हा दाखल आहे.

Web Title: Lifetime for the rapist