शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

जनजीवन विस्कळीत : आरोग्यावर विपरीत परिणाम;

By admin | Updated: March 2, 2015 00:06 IST

तपमानात घटदुसऱ्या दिवशीही जोरदार पाऊस

नाशिक : गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या सीमावर्ती भागात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याने मध्य महाराष्ट्रात पुन्हा थंडीची लाट आली आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात पावसाने हजेरी लावली असून, त्याचा आरोग्यावर आणि पिकांवर विपरीत परिणाम होतो आहे. दोन दिवसांपासून शहराच्या तपमानात घट होत असून, शनिवारी पारा नीचांकी १३ अंश सेल्सिअसपर्यंत घसरला. रविवारी त्यात २ अंशांनी वाढ झाली असली तरी कमाल तपमानात सुमारे ५ अंशांची घट झाल्याने नाशिककरांना हुडहुडी भरली आहे. राज्याच्या सीमेलगत आणि समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यातील अनेक जिल्ह्यांत मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाचे आगमन होत असून, येत्या दोन दिवस हे वातावरण कायम राहणार असल्याचे वेधशाळेने कळविले आहे. मध्य समुद्रात आणि राज्याच्या किनारपट्टीलगत निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे गुजरातच्या सीमेलगत अणि राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचे आगमन झाले आहे. अवेळी आलेला हा पाऊस काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा, तर काही ठिकाणी जोरदार हजेरी लावीत आहे. त्यामुळे थंडीतही वाढ होते आहे. आधीच साथीच्या आजारांची साथ असलेल्या राज्यात पावसाच्या या वातावरणामुळे थंडीतापाचे रुग्ण आणखी वाढले आहेत. नाशिक जिल्ह्यातही अनेक ठिकाणी या पावसाने हजेरी लावली असून, त्यामुळे थंडीत वाढ झाली आहे. सलग दुसऱ्या दिवशीही पाऊस कोसळला. रविवारी दुपारी आणि रात्री उशिराही पावसाने हजेरी लावल्याने रात्री थंडीत वाढ झाली होती. आणखी काही दिवस पावसाचे वातावरण कायम राहणार असून, मध्य महाराष्ट्रात जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे. थंडीतही त्यामुळे वाढ होणार असल्याचे कळविले आहे.