रिमोटच्या कारणावरून पत्नीच्या डोक्यात दगड घालून खून करणाऱ्या पतीस जन्मठेपेची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 19:52 IST2018-09-21T19:50:31+5:302018-09-21T19:52:29+5:30
नाशिक : टिव्हीच्या रिमोट मागीतल्याचा रागातून पत्नीच्या डोक्यात दगड घालून तिचा क्रूरपणे खून करणारा मद्यपी पती पांडुरंग लक्ष्मण मानवतकर (रा़चुंचाळे शिवार, दत्तनगर, अंबड) यास जिल्हा व सत्र न्यायाधीश एऩजी़गिमेकर यांनी शुक्रवारी (दि़२१)जन्मठेप व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली़ १६ जून २०१७ रोजी ही घटना घडली होती़ सरकारी वकील रविंद्र निकम यांनी या खटल्यात ११ साक्षीदार तपासून आरोपीविरोधात न्यायालयात सबळ पुरावे सादर केले़

रिमोटच्या कारणावरून पत्नीच्या डोक्यात दगड घालून खून करणाऱ्या पतीस जन्मठेपेची शिक्षा
नाशिक : टिव्हीच्या रिमोट मागीतल्याचा रागातून पत्नीच्या डोक्यात दगड घालून तिचा क्रूरपणे खून करणारा मद्यपी पती पांडुरंग लक्ष्मण मानवतकर (रा़चुंचाळे शिवार, दत्तनगर, अंबड) यास जिल्हा व सत्र न्यायाधीश एऩजी़गिमेकर यांनी शुक्रवारी (दि़२१)जन्मठेप व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली़ सरकारी वकील रविंद्र निकम यांनी या खटल्यात ११ साक्षीदार तपासून आरोपीविरोधात न्यायालयात सबळ पुरावे सादर केले़ १६ जून २०१७ रोजी ही घटना घडली होती़
हिंगोली जिल्ह्यातील शेणगाव तालुक्यातील वाढोणा येथील पांडुरंग मानवतकर हा पत्नी शोभा व चार मुलींसह चुचांळे शिवारातील दत्तनगरमध्ये संदीप पाटील यांच्या बांधकाम साईटवर वॉचमनचे काम करीत होता़ दारुचे व्यसन असलेला पांडुरंग हा सतत पत्नी शोभा हिस मारहाण करीत असे तसेच दारूसाठी पैसे घेऊन जात असे त्यामुळे त्यांच्यामध्ये सतत वाद होत असत़ १५ जून २०१७ रोजी पांडुरंग हा पत्नीकडून दारुसाठी पैसे घेऊन गेला़ दारु पिऊन घरी आल्यानंतर टिव्ही बघत असताना पत्नी शोभा हिने रिमोट मागितले असता यादोघांमध्ये भांडण झाले़ पत्नी नेहेमी भांडण करते हा राग मनात असलेल्या पांडूरंग याने १६ जून रोजी पहाटे चार वाजेच्या सुमारास घराबाहेरील दगड पत्नीच्या डोक्यात टाकून तिचा खून केला व फरार झाला होता़ या प्रकरणी मयत शोभाचे वडील जनार्दन रत्नपारखी यांनी अंबड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती़
न्यायाधीश गिमेकर यांच्या न्यायालयात सुरू असलेल्या या खटल्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक एम़डी़म्हात्रे यांनी करून दोषारोपपत्र दाखल केले होते़ या खटल्यात सरकारी वकील निकम यांनी अकरा साक्षीदार तपासले त्यामध्ये आरोपी पांडुरंगच्या मोठी अंध मुलगी कोमल हिने सरकार पक्षाला सहकार्य केली नाही मात्र दुसरी मुलगी ममता हिने घडलेली घटना न्यायालयात सांगितली़ प्रत्यक्षदर्शी व परिस्थितीजन्य पुराव्यान्वये आरोपी पांडुरंग मानवतकर यास जन्मठेप व पाच हजार रुपये, दंड न भरल्यास तीन महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली़