विद्यार्थी विकास संघटनेतर्फे वाचनालय सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 00:39 IST2021-07-13T23:09:28+5:302021-07-14T00:39:28+5:30
दिंडोरी : महाराष्ट्र राज्य विद्यार्थी विकास संघटनेच्या १५ व्या वर्धापन दिनानिमित्त तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व वाचनालय सुरू करण्यात आले.

विद्यार्थी विकास संघटनेतर्फे वाचनालय सुरू
दिंडोरी : महाराष्ट्र राज्य विद्यार्थी विकास संघटनेच्या १५ व्या वर्धापन दिनानिमित्त तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व वाचनालय सुरू करण्यात आले.
तालुक्यातील गरीब विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेबाबत सर्व माहिती मिळावी व योग्य मार्गदर्शन लाभावे यासाठी तज्ज्ञांकडून वेळोवेळी माहिती उपलब्ध करून दिली जाईल. तसेच ह्यपुस्तकाशी नाते जोडाह्ण या संकल्पनेतून विद्यार्थ्यांना विविध प्रकारची पुस्तके वाचता यावीत, यासाठी वाचनालय खुले करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील सर्व ठिकाणी स्पर्धा परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना परिपूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असून विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य विद्यार्थी विकास संघटनेचे अध्यक्ष नितीन बोढारे यांनी केले आहे. या वेळी निकेतन जाधव, दत्तू शिंदे, राजेंद्र घोडके, योगेश अंबाडे, किरण देवरे, हरिनाथ प्रसाद, मंगेश बोरस्ते आदी उपस्थित होते.