त्र्यंबकेश्वर तालुक्यात कुष्ठरोग सर्वेक्षण मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 04:40 AM2020-12-04T04:40:11+5:302020-12-04T04:40:11+5:30

त्र्यंबकेश्वर : दरवर्षी डिसेंबर महिन्याच्या १ तारखेपासून क्षयरोग व कुष्ठरोग तपासणीचे सर्वेक्षण सुरू केले जाते. त्या पार्श्वभूमीवर ...

Leprosy survey campaign in Trimbakeshwar taluka | त्र्यंबकेश्वर तालुक्यात कुष्ठरोग सर्वेक्षण मोहीम

त्र्यंबकेश्वर तालुक्यात कुष्ठरोग सर्वेक्षण मोहीम

Next

त्र्यंबकेश्वर : दरवर्षी डिसेंबर महिन्याच्या १ तारखेपासून क्षयरोग व कुष्ठरोग तपासणीचे सर्वेक्षण सुरू केले जाते. त्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर पंचायत समितीच्या तालुका आरोग्य विभागाच्या दालनात सर्वेक्षण मोहीमेच्या कार्यक्रमाचा औपचारिक उद्घाटन सोहळा त्र्यंबकेश्वरचे पंचायत समितीचे सभापती मोतीराम दिवे यांच्या हस्ते झाला.

यावेळी गटविकास अधिकारी किरण जाधव, तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ. मोतीलाल पाटील, अंजनेरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डाॅ. रेखा सोनवणे जगताप आदी उपस्थित हाेते. सदर संयुक्त सर्वेक्षण दि. १६ डिसेंबर दरम्यान चालणार आहे. कार्यक्रमास तालुका गटशिक्षणाधिकारी राजेंद्र शिरसाट, प्रभारी विस्तार अधिकारी (आरोग्य) संजय तायडे, कुष्ठरोग तंत्रज्ञ शुभम मुळे, राजेंद्र गोसावी, विलास खैरनार, श्रद्धा खेडकर, विनायक सोनवणे आदी उपस्थित होते.

Web Title: Leprosy survey campaign in Trimbakeshwar taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.