रेल्वेखाली सापडून बिबट्या ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 23:44 IST2020-04-24T22:42:04+5:302020-04-24T23:44:38+5:30

देवळाली कॅम्प : येथून जवळच असलेल्या लहवित रेल्वेस्थानकानजीक रेल्वे पोल क्रं. १७२/२६ ,२८ च्या दरम्यान शुक्रवार (दि.२४) पहाटेच्या तीनच्या सुमारास अप मार्गावर मुंबईकडे जाणारी मालगाडीखाली सापडून तीन ते चार वर्षीय एका मादी बिबट्याचा जागीच मृत्यू झाला आहे.

 Leopards found under the train and killed | रेल्वेखाली सापडून बिबट्या ठार

रेल्वेखाली सापडून बिबट्या ठार

देवळाली कॅम्प : येथून जवळच असलेल्या लहवित रेल्वेस्थानकानजीक रेल्वे पोल क्रं. १७२/२६ ,२८ च्या दरम्यान शुक्रवार (दि.२४) पहाटेच्या तीनच्या सुमारास अप मार्गावर मुंबईकडे जाणारी मालगाडीखाली सापडून तीन ते चार वर्षीय एका मादी बिबट्याचा जागीच मृत्यू झाला आहे.
याबाबत वनाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार देवळाली कॅम्प रेल्वे स्टेशनकडून पहाटे ३ वाजता एक मालगाडी मुंबईकडे जात असताना लहवित स्टेशननजीक मुंबईकडे जाणाºया लोहमार्गावर मालगाडीसमोर बिबट्या आला जोरदार धडक बसून तो जागीच मृत झाला. याबाबत संबंधित गाडीच्या चालकाने ही माहिती देवळाली कॅम्प रेल्वेस्थानकाचे स्टेशन प्रबंधक आदित्य कुमार यांना कळविली. त्यांनी तेथून गॅगमन प्रवीण गायकवाड व पवन सिंग यांनी घटनास्थळी पाहण्यासाठी पाठविले असता बिबट्यामादी मृतावस्थेत आढळून आली, तर तिचे डोके एका बाजूला पडले होते. त्यानंतर सकाळी वनखात्याने पंचनामा केला.

Web Title:  Leopards found under the train and killed

टॅग्स :Nashikनाशिक