दोनवाडे कालव्याच्या रस्त्यावर बिबट्याची दुचाकीस्वारावर झडप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2020 01:23 IST2020-09-24T22:54:38+5:302020-09-25T01:23:07+5:30
देवळाली कॅम्प : दारणा नदीकाठी असलेल्या दोनवाडे येथील रहिवासी संतोष शिवाजी सांगळे (38) हा साडेसात वाजेच्या दरम्यान ठुबे पोल्ट्रीफॉर्म जवळून कालव्याच्या रस्त्याने दुचाकीने घरी परतत असताना अचानकपणे बिबट्याने शिवाजीच्या दुचाकीवर झडप घेतली. यामुळे शिवाजी रस्त्यावर कोसळला. सुदैवाने बिबट्याने गंभीर जखमी न केल्याने बालंबाल दुचाकीस्वार बचावला.

दोनवाडे कालव्याच्या रस्त्यावर बिबट्याची दुचाकीस्वारावर झडप
देवळाली कॅम्प : दारणा नदीकाठी असलेल्या दोनवाडे येथील रहिवासी संतोष शिवाजी सांगळे (38) हा साडेसात वाजेच्या दरम्यान ठुबे पोल्ट्रीफॉर्म जवळून कालव्याच्या रस्त्याने दुचाकीने घरी परतत असताना अचानकपणे बिबट्याने शिवाजीच्या दुचाकीवर झडप घेतली. यामुळे शिवाजी रस्त्यावर कोसळला. सुदैवाने बिबट्याने गंभीर जखमी न केल्याने बालंबाल दुचाकीस्वार बचावला. लॉकडाऊन काळात बिबट्याने दोनवाडे शिवारात एका वृद्धाला रात्री हल्ला करुन ठार केले होते.तसेच एक चिमुकल्याचाही बळी गेला होता. यामुळे पुन्हा बिबट्याची नागरिकांत भीती निर्माण झाली आहे.
सांगळे हा आपल्या दुचाकीने बोराडे वस्ती जवळून जात असताना बिबट्याने दुचाकीवर उडी घेतली. घाबरलेल्या संतोषने आरडाओरडा केल्याने तेथे घरांसमोर बसलेले काही ग्रामस्थांनी धाव घेतल्याने बिबटया अंधारात पसार झाला. दरम्यान संतोषला भगूर येथे खासगी दवाखान्यात दाखल करत उपचार करण्यात आले आहे. दोनवाडे बोराडेवस्तीजवळ वनविभागाने तातडीने पुन्हा पिंजरा लावण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.