नाशिक - अडसरे बुद्रुक येथे बिबट्या मादी जेरबंद करण्यात आली. इगतपुरी तालुक्यात वाढत्या बिबट्याच्या हल्ल्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून काही दिवसांपूर्वीच तालुक्यातील अधरवड, पिंपळगाव मोर, देवाचीवाडी आदीं ठिकाणी बिबट्याने केलेल्या हल्ल्याच्या घटना घडल्या. दोन दिवसांपूर्वीच खैरगाव येथील एका वद्धावर हल्ला चढवत या बिबट्याच्या हल्ल्यात वृद्धाला आपले प्राण गमवावे लागल्याची घटना ताजी आहे. इगतपुरी तालुक्यातील अडसरे बुद्रुक येथे आठ दिवसांपूर्वी एका शेतकऱ्याचे दोन श्वान व सात शेळ्या फस्त केल्याची घटना घडली होती. या परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला असतांना नागरिकांनी या परिसरात पिंजरा लावण्याची मागणी केली होती. वनविभागाकडून या ठिकाणी आठ दिवसांपूर्वी पिंजरा लावण्यात आला होता. आज पहाटे भक्ष शोधण्यासाठी आलेली दोन ते अडीच वर्षाची बिबट्या मादी अडसरे बुद्रुक येथील पनाल चौरे वस्ती येथे लावलेल्या पिंज-यात अखेर जेरबंद झाली
नाशिकमध्ये बिबट्या जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2021 11:05 IST