बिबट्याचा भरदुपारी शेतात युवकावर हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 00:45 IST2021-03-14T21:34:35+5:302021-03-15T00:45:43+5:30
इगतपुरी : तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी बिबट्याचा भरदुपारी शेतात पाहणी करत असलेल्या युवकावर हल्ला झाल्याच्या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

बिबट्याचा भरदुपारी शेतात युवकावर हल्ला
इगतपुरी : तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी बिबट्याचा भरदुपारी शेतात पाहणी करत असलेल्या युवकावर हल्ला झाल्याच्या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
इगतपुरी तालुक्यातील खेड परिसरात शनिवारी (दि.१३) रात्री बिबट्याच्या हल्ल्याची घटना ताजी असतानाच व वनविभागाने या परिसरात चार पिंजरे लावले असताना देखील रविवारी (दि.१४) भरदुपारी घोडेवाडी येथील पंढरी घोडे या ३७ वर्षीय तरुणावर त्याच्या घरासमोर असलेल्या शेतात गव्हाची पाहणी करत असताना पिकात दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर हल्ला चढवला. त्याने प्रसंगावधान राखत प्रतिकार करून आरडाओरड केल्याने बिबट्याने धूम ठोकली.
यात युवकाच्या पाठीला हातावर व दंडावर बिबट्याने चावा घेतला आहे. दरम्यान काही लोकांनी डोंगरावरील वाळलेल्या गवतास पेटवून दिल्याने आपला जीव वाचविण्यासाठी हे प्राणी मानवी वस्तीचा रस्ता धरत असून गावात कोल्हे, तरस इत्यादी प्राण्याचे सध्या दर्शन घडत असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात येते. मात्र अशा परिस्थितीमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.