बिबट्याच्या हल्ल्यात तीन शेळ्या ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 00:53 IST2018-11-14T00:53:01+5:302018-11-14T00:53:16+5:30

म्हाळसाकोरे येथे प्राथमिक आरोग्य केंद्रालगत शेळ्यांच्या वाड्यावर बिबट्याने अचानक हल्ला करत तीन शेळ्या फस्त केल्या

In the leopard attack killed three goats | बिबट्याच्या हल्ल्यात तीन शेळ्या ठार

बिबट्याच्या हल्ल्यात तीन शेळ्या ठार

सायखेडा : म्हाळसाकोरे येथे प्राथमिक आरोग्य केंद्रालगत शेळ्यांच्या वाड्यावर बिबट्याने अचानक हल्ला करत तीन शेळ्या फस्त केल्या यात एकनाथ धोंडीबा हुलारे यांचे नुकसान झाले. गावकुसाला एकनाथ हुलारे आपल्या मालकीच्या जागेवर शेळी पालन व्यवसाय करतात. संध्याकाळी वाड्यावर नेहमीप्रमाणे शेळ्या बांधून घराच्या बाजूला बसलेले असताना अचानक बिबट्याने हल्ला केला. जवळच उसाचे शेत असून त्यामध्ये एक एक करीत तीन शेळ्या बिबट्याने ओढून नेल्या. हुलारे यांनी तत्काळ आजूबाजूंच्या लोकांना बोलाविले; मात्र बिबट्या उसात गेल्याने दिसला नाही.

Web Title: In the leopard attack killed three goats