शहरं
Join us  
Trending Stories
1
स्लोव्हाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्यावर प्राणघातक हल्ला, रुग्णालयात दाखल 
2
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
3
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
4
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
5
चार प्रमुख उमेदवार, चार फॅक्टर! कोण होणार औरंगाबादचा खासदार?; मतदानानंतर असं दिसतंय 'गणित'
6
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
7
दिव्या खोसलासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांवर भूषण कुमार यांनी सोडलं मौन; म्हणाले...
8
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
9
CAA अंतर्गत भारताचे नागरिकत्व देण्यास सुरुवात, गृहमंत्रालयाने 14 जणांना दिली प्रमाणपत्रे...
10
"फिरायला गेले नव्हते..."! प्रियांका गांधी अमित शाह यांच्यावर भडकल्या; थायलंडला कशासाठी गेल्या होत्या? स्पष्टच सांगितलं
11
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
12
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
13
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
14
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
15
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं
16
मुसलमान आणि आमचा DNA एकच; मुलाच्या प्रचारावेळी बोलताना ब्रिजभूषण भावूक  
17
12वी पास कंगनाकडे कोट्यवधींचे हीरे, एकाच दिवसात खरेदी केल्या LIC च्या 50 पॉलिसी, जाणून घ्या किती आहे संपत्ती?
18
गंभीर हसल्याशिवाय क्रशला प्रपोज करणार नाही; तरूणीच्या पोस्टरला भारतीय दिग्गजाचं उत्तर
19
मराठमोळ्या अभिनेत्रीला झालाय गंभीर आजार, व्हिडिओ शेअर करत म्हणाली, 'मी प्रेग्नंट नाही...'
20
"आमच्या घरी ईद साजरी केली जायची"; पंतप्रधान मोदींनी सांगितला मुस्लिम शेजाऱ्यांचा किस्सा

भुजबळांच्या सुटकेने विधान परिषदेचे गणित बदलणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2018 5:26 AM

जिल्ह्याच्या राजकारणावर पकड ठेवणारे राष्ट्रवादी चे नेते छगन भुजबळ यांच्या सुटकेने विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे गणित बदलणार आहे. राष्ट्रवादीटचे उमेदवार शिवाजी सहाणे यांना यामुळे मोठा दिलासा मिळाला तर शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे, विकास आघाडीचे परवेज कोकणी यांच्या समर्थकांमध्ये नाराजी पसरली आहे.

नाशिक - जिल्ह्याच्या राजकारणावर पकड ठेवणारे राष्टÑवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या सुटकेने विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे गणित बदलणार आहे. राष्टÑवादीचे उमेदवार शिवाजी सहाणे यांना यामुळे मोठा दिलासा मिळाला तर शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे, विकास आघाडीचे परवेज कोकणी यांच्या समर्थकांमध्ये नाराजी पसरली आहे.दोन वर्षापूर्वी छगन भुजबळ हे महाराष्टÑ सदन घोटाळा प्रकरणी तुरूंगात गेल्यानंतर नाशिकच्या राजकारणावरील त्यांची पकड सैल झाली होती परंतु तरिही पक्षपातळीवरील कोणतेही मोठे निर्णय घेताना भुजबळ यांचे मत विचारात घेतले जात होते. मात्र प्रत्येक वेळी जामीन नामंजूर झाल्यामुळे भुजबळ यांचा तुरूंगातील मुक्काम वाढत गेल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये व विशेषत: राष्टÑवादी कॉँग्रेसमध्ये मरगळ आली होती. भुजबळ तुरूंगात असतानाच्या काळातच नाशिक महापालिकेची व जिल्हा परिषद अशा दोन मोठ्या निवडणुका त्यांच्या गैरहजेरीत झाल्या. पक्षाला त्यांची उणीव भासली. दोन्ही निवडणुकीत राष्टÑवादीची कामगिरी जेमतेम राहिली.राज्यात विधान परिषद निवडणुकीतील उमेदवारांच्या अर्जांची छाननी सुरू असतानाच शुक्रवारी छगन भुजबळ यांना उच्च न्यायालयाने जमीन मंजूर केल्याने गणिते बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघात राष्टÑवादीने शिवाजी सहाणे यांना उमेदवारी दिली असून, शिवसेनेकडून नरेंंद्र दराडे रिंगणात आहेत. दराडे हे येवल्यातील असून, एकेकाळी त्यांनी येवला मतदार संघाची जागा आघाडीने राष्टÑवादी काँग्रेसला सोडल्याच्या निषेधार्थ जिल्हा काँग्रेस कमिटीसमोर उपोषण केले होते. परंतु तरिही भुजबळ यांनाच येवल्यातून उमेदवारी मिळाली. काही काळानंतर दराडे यांनी भुजबळ यांच्याशी जुळवूनही घेतले होते. गेल्या दोन वर्षांपासून दराडे यांनी येवल्यातून विधानसभेची निवडणूक लढविण्याची तयारीही सुरू केली होती. राज्यातील सत्तांतरानंतर दराडे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे विधान परिषदेच्या निमित्ताने दराडे यांचे येवल्यातील वर्चस्व वाढणे भुजबळ यांना राजकीय दृष्ट्या धोकेदायक ठरू शकत असल्याने कोणत्याही परिस्थितीत दराडे यांना रोखण्यासाठी भुजबळ यांच्याकडून प्रयत्न केला जाणे साहजिकच आहे. त्यामुळे विधान परिषदेच्या निवडणुकीची समिकरणे भुजबळ यांच्यामुळे बदलण्याची शक्यता आहे.भुजबळ बाहेर आले, आता कसे?मुंबई : माजी मुख्यमंत्री छगन भुजबळ यांना जामीन मिळाल्यामुळे तुरुंगातील कोठडी तर रिकामी झाली, आता कसे? असा टोला राष्टÑवादी काँग्रेसच्या नेत्याने भाजपाला लगावला आहे.तुरुंगात भुजबळांच्या शेजारच्या कोठड्या खाली आहेत. त्याही लवकरच भरल्या जातील, असे सूचक वक्तव्य सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाजपाच्या स्थापना दिनी आयोजित कार्यक्रमात बोलताना केले होते. त्यांचा इशारा अजित पवार, सुनील तटकरे यांच्याकडे होता.बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी तुरुंगात असलेले छगन भुजबळ यांना उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्याने राष्टÑवादी काँग्रेसच्या नेत्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. महाराष्टÑ सदन आणि सिंचन घोटाळ्यावरून राष्टÑवादीच्या नेत्यांवर भाजपाकडून सातत्याने आरोप होत आहेत. भुजबळ यांच्या पाठोपाठ आता अजित पवार, तटकरे हे देखील तुरुंगात जातील, अशा वल्गना केल्या जात आहेत. त्यावर राष्टÑवादीचा एक नेता म्हणाला, न्यायालयानेच भुजबळांना तरुंगाबाहेर काढले आहे. त्यामुळे भाजपाचे नेते आता कोणत्या तोंडाने आमच्यावर आरोप करणार. या सरकारकडे सांगण्यासारखे काही नसल्यामुळे विरोधकांना सतत धमकावणे हाच एकमेव उद्योग भाजपाच्या नेतेमंडळीकडून होत आहे. पण आम्ही अशा धमक्यांना भीत घालत नाही.च्भुजबळांना जामीन मिळू नये यासाठी सरकारकडून सातत्याने प्रयत्न केले जात होते. आरोप सिद्ध होण्यापूर्वीच त्यांना तुरुंगात डांबण्यात आले. ही छळवणूक आहे, असा आरोप पक्षाचे उपाध्यक्ष नवाब मलिक यांनी केला आहे.

टॅग्स :Chagan Bhujbalछगन भुजबळNashikनाशिक